ETV Bharat / state

मिटकरींची संधी हुकली? राष्ट्रवादीकडून 'या' दोन सदस्यांची विधानपरिषदेवर वर्णी

author img

By

Published : Dec 20, 2019, 9:55 AM IST

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शिवाजीराव गर्जे व अदिती नलावडे यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात आली असून दोघेही आज विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतील.

ncp
राष्ट्रवादी काँग्रेस

अहमदगर - शिवाजीराव गर्जे व अदिती नलावडे यांची राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेवर नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गर्जे हे पाथर्डी तालुक्यातील दुलेचांदगाव गावचे रहिवासी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून ते पवारांसोबत काम करताता. त्यांना भारतीय प्रशासन सेवेमध्ये काम करण्याचा अनुभव आहे. तर प्रदेश सरचिटणीस म्हणून गेली काही वर्षे जबाबदारी सांभाळली आहे. तसेच युवती राष्ट्रवादीच्या मुंबईच्या अध्यक्षा अदिती नलावडे यांनाही राष्ट्रवादीने संधी दिली आहे. दोघेही आज आमदारकीची शपथ घेणार आहेत.

ncp shivajirao garje
शिवाजीराव गर्जे

हेही वाचा -'भाजपची पालखी आयुष्यभर वाहणार नाही, असा शब्द बाळासाहेबांना दिला होता'

राष्ट्रवादीकडून 6 वर्षांपूर्वी राज्यपाल नियुक्त सदस्य विधान परिषदेवर घेण्यात आले होते. त्यातील राहुल नार्वेकर यांनी पदाचा राजीनामा देऊन शिवसेनेकडून विधानसभेची निवडणूक लढविली. ते निवडूनही आले. दुसरे राम वडकुते यांनी पक्षावर नाराज होत आमदाकीचा राजीनामा दिला होता. विधान परिषदेच्या या दोन जागा रिक्त झाल्याने राष्ट्रवादीने तातडीने आपले दोन नवीन चेहरे विधान परिषदेवर देण्याचा निर्णय घेतला आहे.

aditi nalawade
अदिती नलावडे

अदिती या विधानसभेचे माजी अध्यक्ष व शिवसेनेचे नेते दत्ताजी नलावडे यांची पुतणी आहेत. वरळीमधून आदित्य ठाकरे यांच्याविरोधात निवडणूक लढविण्यासाठी त्यांच्या नावाची चर्चा होती. आक्रमक कार्यकर्त्या म्हणून त्यांचा परिचय आहे. तर गर्जे हे राष्ट्रवादीच्या कार्यालयातील कामकाज पाहतात.

राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्या टप्प्यात अमोल मिटकरी यांना संधी देईल, अशी चर्चा होती. मात्र त्यांच्याऐवजी या दोघांना संधी मिळाली आहे.

हेही वाचा - अण्णांचे 20 डिसेंबरपासून मौनव्रत; निर्भयाच्या गुन्हेगारांना त्वरित फाशीची केली होती मागणी

Intro:शिवाजीराव गर्जे विधानपरिषदेवरBody:शिवाजीराव गर्जे यांची राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कडून विधान परिषदेवर नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला, शिवाजिराव गर्जे हे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील दुलेचांदगाव या गावचे रहिवासी आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून शिवाजीराव गर्जे हे शरद पवार साहेबांच्या बरोबर आहेत, भारतीय प्रशासन सेवेमध्ये असताना त्यांचे व पवार साहेबांचे मैत्रीचे संबंध आहेत त्याचा फायदा आज शिवाजीराव गरजे यांना होताना दिसत आहे,राष्ट्रवादी काॅंग्रेसने संघटनेत काम करणाऱ्यांना पदावर स्थान द्यायचे ठरविलेले धोरण अमलात आणले असून प्रदेश सरचिटणीस म्हणून गेली काही वर्षे जबाबदारी सांभाळणारे शिवाजीराव गर्जे आणि युवती राष्ट्रवादीच्या मुंबईच्या अध्यक्षा अदिती नलावडे यांना विधान परिषदेवर संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. हे दोघेही तातडीने उद्याच आमदारकीची शपथ घेणार आहेत.


राष्ट्रवादीकडून सहा वर्षांपूर्वी राज्यपाल नियुक्त सदस्य विधान परिषदेवर घेण्यात आले होते. त्यातील राहुल नार्वेकर यांनी पदाचा राजीनामा देऊन शिवसेनेकडून विधानसभेची निवडणूक लढविली. ते निवडूनही आले. दुसरे राम वडकुते यांनी पक्षावर नाराज होत आमदाकीचा राजीनामा दिला होता. विधान परिषदेच्या या दोन जागा रिक्त झाल्याने राष्ट्रवादीने तातडीने आपले दोन नवीन चेहरे विधान परिषदेवर देण्याचा निर्णय घेतला

अदिती या विधानसभेचे माजी अध्यक्ष व शिवसेनेचे नेते दत्ताजी नलावडे यांच्या पुतणी आहेत. वरळीमधून आदित्य ठाकरे यांच्याविरोधात निवडणूक लढविण्यासाठी त्यांच्या नावाची चर्चा होती. आक्रमक कार्यकर्त्या म्हणून त्यांचा परिचय आहे. गर्जे हे राष्ट्रवादीच्या कार्यालयातील सर्व कामकाज पाहतात.

राष्ट्रवादी काॅंग्रेस पहिल्या टप्प्यात अमोल मेटकरी यांना संधी देईल, अशी चर्चा होती. मात्र त्यांच्याऐवजी या दोघांनी संधी मिळाली आहे.Conclusion:शिवाजीराव गर्जे विधानपरिषदेवर
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.