ETV Bharat / state

Worm Through Eyes of Farmers : नगरमध्ये शेतकऱ्यांच्या डोळ्यातून कांद्याची अळी निघण्याचा विचित्र प्रकार; शास्त्रज्ञांनी शेताला दिली भेट

author img

By

Published : Apr 3, 2023, 7:09 PM IST

Updated : Apr 3, 2023, 8:17 PM IST

मागील काही दिवसांपूर्वी कांद्यावरून राजकारण चांगलेच तापले होते. कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी मुंबईला मोर्चा नेऊन मोठे आंदोलन केले. या आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांनी कांद्याला योग्य हमीभाव मिळण्यासाठी मोठे आंदोलन केले. आता नगर जिल्ह्यात एक विचित्र प्रकार समोर आला आहे. कांदा माशीची अळी-कीड शेतकऱ्यांच्या डोळ्यातून बाहेर पडू लागली आहे.

Scientists Visited Onion Farm
नगरमध्ये डोळ्यातून अळी निघण्याचा प्रकर कांदा माशीची किडीतून

नगरमध्ये शेतकऱ्यांच्या डोळ्यातून कांद्याची अळी निघण्याचा विचित्र प्रकार

अहमदनगर : कांदा माशीची कीड ही फक्त कांदा आणि लसूण या दोनच पिकांवर पडते. ती जमिनीच्या पृष्ठभागावर किंवा कांद्याच्या पापुद्र्यात आढळते. त्यात अळीने अंडी घातल्याने तीच अंडी कांदा काढत्यावेळी मजुरांच्या डोळ्यात गेली. त्यातूनच अळ्या निघण्याचा प्रकार घडला. मात्र, यामध्ये शेतकऱ्यांनी घाबरून जाण्यासारखे काहीही नाही, असा प्रकार क्वचितच एखाद्या ठिकाणी घडतो, अशी माहिती महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कांदा कीटकनाशक शास्त्रज्ञ डाॅ. भारत पाटील यांनी दिली.

कांद्याच्या शेतात मजुरांच्या डोळ्यात अळीचा प्रकार : राहुरी तालुक्यातील वळण येथील कांद्याच्या शेतात कांदा काम करणा-या मजुरांच्या डोळ्यात अळी निघण्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. हा प्रकार नेमका काय असावा याबाबत शेतक-यांमधे अन् मजुरांमधे प्रचंड घबराट पसरली होती. यानंतर घटनास्थळी तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे, महात्म्या फुले कृषी विद्यापीठाचे कांदा प्रमुख शास्त्रज्ञ डाॅ. भारत पाटील, भाजीपाला कीटक शास्त्रज्ञ प्रा. सोमनाथ पवार, रोग शास्त्रज्ञ प्रा. चिमाजी बाचकर, प्रा. अन्सार आत्तार, व्यवस्थापक कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे डाॅ. दत्तात्रय पाचरने आदींनी भेट देऊन पाहणी केली.

कांदा कीड पूर्वी उत्तर भारतात : कांदा कीड ही पूर्वी उत्तर भारतात आढळायची. परंतु, आता अशी कीड महाराष्ट्रात क्वचितच आढळते. मात्र, यामध्ये शेतकऱ्यांनी घाबरण्याचे कारण नाही कारण काम करते वेळी फक्त काळजी घ्यावी, असे आवाहनदेखील यावेळी करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी कांद्याच्या हमीभावावरून राजकारण : होळी नंतर सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासादायक घोषणा करण्यासाठी राज्य सरकारने याबाबत समिती गठीत केली आहे. या समितीच्या माध्यमातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना क्विंटल मागे तीनशे ते चारशे रुपये अनुदान मिळावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच कांद्याचा मुद्दा गाजताना पाहायला मिळाला आहे. कांद्याचे भाव गडगडल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला होता. कांद्याला अनुदान मिळावे तसेच कांद्याची निर्यात सुरू व्हावी यासाठी राज्यभरात कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरला होता. तर, दुसरीकडे विरोधकांनी देखील सरकारी पक्षाला अर्थसंकल्पीय अधिवेशनात धारेवर धरले आहे.

हेही वाचा : Prime Minister Modi: देशाला भ्रष्टाचारमुक्त करणे ही सीबीआयची महत्त्वाची जबाबदारी - पंतप्रधान मोदी

Last Updated :Apr 3, 2023, 8:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.