ETV Bharat / state

IT engineer grown Apple farming: तरुण शेतकऱ्यांपुढे आदर्श! वाकडी येथील आयटी इंजिनियरने पिकविली सफरचंद पिकाची फळबाग

author img

By

Published : Jul 21, 2022, 11:56 AM IST

सध्या तरूणांचा नोकरी सोडून स्वतंत्र्य व्यवसाय सुरू करण्याकडे कल असतो. पण त्याला पाठ दाखवत राहतामध्ये वाकडी येथील आयटी इंजिनियर विक्रांत रूपेंद्र काले याने सफरचंदाची शेती केली आहे. यात त्यांना यशही येत आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यात यशस्वी रित्या फळबाग पिकऊन होतकरू तरुण शेतकऱ्यांपुढे विक्रांत रूपेंद्र काले यांनी शेतीचा आदर्श ( model of agriculture for young farmers )निर्माण केला आहे.

Apple farming
सफरचंद शेती

राहाता ( अहमदनगर ) - राहाता तालुक्यातील वाकडी येथील आयटी इंजिनियर विक्रांत रूपेंद्र काले ( IT Engineer Vikrant Rupendra Kale ) यांनी आपल्या वाकडी येथील शेतात सफरचंद शेती ( Apple farming ) घेत यशस्वी रित्या फळबाग पिकऊन होतकरू तरुण शेतकऱ्यांपुढे शेतीचा आदर्श ( model of agriculture for young farmers )निर्माण केला आहे.

विक्रांत रूपेंद्र काले

नोकरी सोडून शेतीला प्राधान्य - विक्रांत काले यांनी आयटी व लॅंड स्केपिंगमध्ये इंजिनियरिंग शिक्षण ( Engineering in Landscaping ) घेतले. वडील रूपेंद्र काले हे शेतकरी संघटनेत ( Farmer Association ) असून शेती व शेतकरी या गोष्टींचे पुरेपूर मार्गदर्शन व चुलते आनंद कले यांचा शेती, फळझाडे,व फूलझाडे यांचा चांगला अभ्यास व अनुभव असल्याने विक्रांत यांनी लाखो रूपये पॅकेज मिळणारी नोकरी सोडून वेगळ्या पद्धतीची व नविन पिकाची शेती करण्याचे ठरविले. त्यासाठी, विक्रांत यांनी आपल्या वाकडी सारख्या बदलत्या हवामान ठिकाणी हिमाचल प्रदेशमधील ( Himachal Pradesh )मुख्य पीक सफरचंद ही फळबाग शेती घेण्याचा नीश्चय केला आहे.

एक एकरात 450 रोपे - विक्रांत यांनी हिमाचल प्रदेशमध्ये जाऊन सफरचंद फळबाग पिकाचा पूर्ण अभ्यास करून आल्यावर त्यांच्या वाकडी येथील शेतातील दीड एकर शेतात एच एम आर व अण्णा जातीची रोपे लावली ( H.M.R And Anna Plant Species ). या रोपांची 8 बाय 13 फुटावर लागवड केली. एक एकरात 450 रोपे बसतात. हे रोप शंभर ते दीडशे रुपयात पडते. सफरचंद रोपाची लागवड केल्यावर तीन वर्ष आंतरपीक घेता येते. तसेच या पिकास इतर फळबाग पिकासारखे फवारे व जास्त खर्च देखील लागत नाही. वर्षातून एकदा फळ येणाऱ्या या झाडााला सुरुवातीला सुमारे 10 किलो फळ निघते. नंतर फळाचे प्रमाण वाढते. या फळझाडाचे 20 वर्ष आयुष्यमान आहे. हे सफरचंद पीक 45 डिग्री तापमानात देखील येते. याची खात्री देखील शेतात झाली. असल्याचे विक्रांत यांनी सांगितले. वाकडी येथील काले बंधू यांच्या संकेत नर्सरीमध्ये आता सफरचंद रोपे विकसीत केले असून विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे विक्रांत यांचे वडील रुपेंद्र काले यांनी सांगितले.

अपूर्ण माहितीमुळे दुर्लक्ष - नगर जिल्ह्यात सफरचंद पीक घेण्यास बहुतेक शेतकरी या पिकाबद्दल असलेल्या अपूर्ण माहितीमुळे तयार होत नाहीत. मुळात सफरचंद पीक कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे असून बदलत्या हवामानात व 45 डिग्री तापमानात देखील हे पिक यशस्वी होऊ शकते असा आमचा अनुभव आहे. अहमदनगर जिल्ह्यात सफरचंद पीक मोजक्या शेतकऱ्यांनी केले आहे. त्यात राहाता तालुक्यात आम्ही वाकडी येथील शेतात सफरचंद पीक घेतले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सफरचंद पिक लागवड करण्यास हरकत नाही. तसेच ज्या शेतकऱ्यांना सफरचंद पिकाची लागवड करायची आहे. त्यांना रोपे उपलब्ध करून देऊन या पिकाविषयी मार्गदर्शन केले जाईल. असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा - Aditya Thackerays Shiv Sanvad Yatra: आदित्य ठाकरेंचा शिवसेनेला सावरण्याचा प्रयत्न, शिव संवाद यात्रेला सुरुवात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.