ETV Bharat / city

Aditya Thackerays Shiv Sanvad Yatra: आदित्य ठाकरेंचा शिवसेनेला सावरण्याचा प्रयत्न,  शिव संवाद यात्रेला सुरुवात

author img

By

Published : Jul 21, 2022, 10:38 AM IST

Aditya Thackerays Shiv Sanvad Yatra
आदित्य ठाकरे यांची शिव संवाद यात्रा

आता आदित्य ठाकरे पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आले ( Aditya Thackeray in action mode ) असून ते संवाद यात्रेद्वारे महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे पुन्हा शिवसेनेला उभारी देण्याच्या प्रयत्नात ते पहायला मिळणार आहेत. २१ जुलै २०२२ रोजी भिवंडीतून शिवसंवाद यात्रेला सुरुवात होईल. त्यानंतर शहापूर, इगतपुरी, नाशिक येथे स्वागत संवाद पार पडणार आहे. तर दुसऱ्या दिवशी मनमाड, वैजापूर, संभाजीनगर येथे स्वागत संवाद पार पडेल.

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी ४० आमदारांना सोबत घेऊन बंड पुकारल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची पूर्ण वाताहत होताना दिसत आहे. त्यातच आता आमदारांपाठोपाठ शिवसेनेच्या १२ खासदारांनी सुद्धा शिंदे गटात प्रवेश केल्याने शिवसेनेला पुन्हा महाराष्ट्रात शून्या पासून उभारी घ्यावी लागणार आहे. आता ही पूर्ण जिम्मेदारी नव्याने पेलण्यासाठी शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे ( Yuva Sena leader Aditya Thackeray )सज्ज झालेले आहेत. २१ ते २३ जुलै या दरम्यान महाराष्ट्रातील शिवसंवाद यात्रेला ( Shiv sanvad Yatra ) ते सुरुवात करणार असून महाराष्ट्रातील जनतेशी आणि लाखो शिवसैनिकांची मन जिंकण्यासाठी त्यांनी ही संवाद यात्रा सुरू केलेली आहे.

शिवसेनेला पुन्हा उभारी देण्यासाठी धडपड? - माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Shiv Sena chief Uddhav Thackeray ) हे शिवसैनिकांना भेटत नव्हते, कार्यकर्त्यांना भेटत नव्हते, पदाधिकाऱ्यांना भेटत नव्हते, आमदारांना भेटत नव्हते, खासदांना भेटत नव्हते, असे एक ना अनेक आरोप आता सातत्याने त्यांच्यावर होत असताना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा मातोश्री ( Matoshree ) व सेनाभवन चे दरवाजे सर्वसामान्य शिवसैनिकांसाठी खुले केले आहेत. त्यातच आता आदित्य ठाकरे सुद्धा पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आले ( Aditya Thackeray in action mode ) असून ते संवाद यात्रेद्वारे महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधून पुन्हा शिवसेनेला उभारी देण्याच्या प्रयत्नात आहेत.

सध्याच्या राजकीय परिस्थिती दरम्यान महत्त्वाचा दौरा - २१ ते २३ जुलै अशी त्यांची महाराष्ट्रातील शिवसंवाद यात्रा असून प्रथम टप्प्यात भिवंडी, नाशिक, दिंडोरी, संभाजीनगर आणि शिर्डी मधील समाजातील सर्व वयोगट आणि समाज बांधवांशी ते संवाद साधणार आहेत. त्याचबरोबर सामान्य नागरिक, जेष्ठ नागरिक आणि प्रामुख्याने तरुणांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांचा हा दौरा असणार आहे. समाजकारण करत लोकांच्या समस्यांवर उपाय शोधून त्यांना चिंतामुक्त करणे हाच संकल्प असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांच्या या संवाद यात्रेला विशेष महत्त्व तर आहेच, पण त्याहून अधिक म्हणजे ही संवाद यात्रा समाजातील सर्व स्तरातील जनतेपासून ते शिवसैनिकांमध्ये नवीन ऊर्जा आणण्यासाठी उपयोगी ठरणार आहे.

शिव संवाद यात्रा वेळापत्रक - शिव संवाद यात्रेचा प्रारंभ हा २१ जुलै २०२२ रोजी भिवंडी ( Shiv Sanvad Yatra starts from Bhiwandi ) येथे दुपारी १२ वाजता संपन्न होणाऱ्या शिवसैनिकांच्या मेळाव्याने होणार असून प्रथम दिवसाच्या यात्रेची सांगता नाशिक येथे संध्याकाळी ६:३० या वेळेत होणाऱ्या जन मेळाव्याने होणार आहे.

दिनांक २१ जुलै २०२२ - दुपारी १२ वाजता भिवंडी येथे मेळाव्याने शिवसंवाद यात्रेला सुरुवात होईल. दुपारी २:३० ते २:५० शहापूर ( Shahapur ) येथे स्वागत संवाद. दुपारी ३:५० ते ४:१५ इगतपुरी ( Igatpuri ) येथे स्वागत संवाद. संध्याकाळी ५:४५ ते ६:४५ वाजता नाशिक येथे शिवसंवाद ( Shiv Samvad at Nashik ) .

दिनांक २२ जुलै २०२२ - या शिव संवाद यात्रेच्या द्वितीय दिवशी, सकाळी ११:४५ मनमाड शहरात संपन्न होणाऱ्या मेळाव्यात आदित्य ठाकरे जनतेला संबोधित करणार असून दुसऱ्या दिवसाच्या यात्रेची सांगता संभाजीनगर येथे सायंकाळी ६:३० वाजता होणाऱ्या मेळाव्याने होईल. सकाळी ११:४५ दुपारी १२:४५ मनमाड येथे शिवसंवाद मेळावा. दुपारी १:४० ते २:०० वाजेपर्यंत येवला येथे स्वागत संवाद. दुपारी २:४५ ते ३:०० वाजेपर्यंत वैजापूर येथे स्वागत संवाद. संध्याकाळी ५:३० ते ६:३० वाजता संभाजीनगर येथे शिवसंवाद मेळावा.

दिनांक २३ जुलै २०२२ - या शिवसंवाद यात्रेच्या तिसऱ्या दिवशी सकाळी ११:३० वाजता पैठण येथे शिवसैनिकांकडून आदित्य ठाकरे यांचे स्वागत केले जाणार आहे. यात्रेची सांगता सायंकाळी ५:१५ शिर्डी येथे शिर्डी वासियांकडून आदित्य ठाकरे यांच्या स्वागताने तसेच लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री साईंच्या दर्शन आणि आशीर्वादाने होईल. सकाळी ११:३० ते दुपारी १२:३० वाजेपर्यंत पैठण येथे स्वागत संवाद. दुपारी २:०० ते २:२० गंगापूर येथे स्वागत संवाद. दुपारी २:५० ते ४:०० वाजेपर्यंत नेवासा येथे शिवसंवाद मेळावा. संध्याकाळी ४:४५ ते ५:१५ शिर्डी येथे स्वागत आणि दर्शन.

हेही वाचा - President election results : मुर्मू, सिन्हा यांच्यातून कोण होणार राष्ट्रपती? आज आहे निकाल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.