ETV Bharat / state

Gondia : पारंपरिक धानशेतीला फाटा देत घेतले शंभरावर विविध नगदी पिके, मिळवले लाखोंचे उत्पादन, शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श

author img

By

Published : Feb 13, 2022, 11:06 AM IST

Updated : Feb 13, 2022, 11:12 AM IST

gondia farmer success story
धान उत्पादक शेतकऱ्याची यशोगाथा

गोंदिया जिल्हा हा धानाचा जिल्हा म्हणून अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. मात्र आता अनेक शेतकरी या पारंपारिक धान शेतीला फाटा देत अनेक प्रकारच्या शेती करत असल्याचे जिल्ह्यात दिसत ( gondia farmer success story ) आहे. मात्र दादा फुंडे यांनी बारमाही शंभरावर सेंद्रिय पिकाचे उत्पादन ( Organic crop production gondia ) आपल्या शेतात घेवून लाखो रूपये ते ( Organic farming process ) कमवितात. त्यांनी अनेकांना रोजगार ही उपलब्ध करून दिला ( Employment in Organic farming ) आहे. इतरही शेतकऱ्यांनी त्यांचे अनुकरण करावे अशी प्रेरणाही इतर शेतकऱ्यांना देत आहेत. त्यामुळे धानाच्या पट्ट्यात आता शेतकरी बागायती शेतीकडे वळू लागली आहेत. यांच्या प्रयोगशील आणि नाविण्यपुर्ण शेती त्यांच्या पत्नीचासुद्धा मोलाची साथ देत आहेत.

गोंदिया - गोंदिया जिल्हा हा धानाचा जिल्हा म्हणून अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. मात्र आता अनेक शेतकरी या पारंपारिक धान शेतीला फाटा देत अनेक प्रकारच्या शेती करत असल्याचे जिल्ह्यात दिसत ( gondia farmer success story ) आहे. मात्र दादा फुंडे यांनी बारमाही शंभरावर सेंद्रिय पिकाचे उत्पादन ( Organic crop production gondia ) आपल्या शेतात घेवून लाखो रूपये ते ( Organic farming process ) कमवितात. त्यांनी अनेकांना रोजगार ही उपलब्ध करून दिला ( Employment in Organic farming ) आहे. इतरही शेतकऱ्यांनी त्यांचे अनुकरण करावे अशी प्रेरणाही इतर शेतकऱ्यांना देत आहेत. त्यामुळे धानाच्या पट्ट्यात आता शेतकरी बागायती शेतीकडे वळू लागली आहेत. यांच्या प्रयोगशील आणि नाविण्यपुर्ण शेती त्यांच्या पत्नीचासुद्धा मोलाची साथ देत आहेत.

प्रतिक्रिया

सेंद्रिय शेतीला प्राधान्य -

गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खैरी येथे दादाजी फुंडे यांनी आपल्या गावातच शेती व्यवसायात आपल्याला झोकून दिले आहे. पारंपारिक शेतीला बगल देत नव्या तंत्रज्ञानाची सांगड घालून आधुनिक पद्धतीने सेंद्रिय शेती करून लाखोचे उत्पन्न घेण्याचे कसब दादा फुंडे आत्मसात केले. धानाच्या शेतीला देत आपल्या पिकाचे उत्पादन घेवून शंभरावर मजूरांना रोजगारही उपलब्ध करून दिला. अंतर्गत येत असलेल्या ब्राम्हणटोला या खेडेगावातील असलेल्या दादा फुंडे यांनी 1980 पासून शेती व्यवसायाला सुरूवात केली. बारमाही पाण्याची बारमाही शेती करण्याचा ठाम निश्चय केला. एका वेगळ्या पद्धतीने शेती करण्याचा संकल्प त्यांनी करून दाखवत 13 एकराचा एकत्रित प्लाट खैरी येथे खरेदी केला. त्यानंतर 2005 साली प्लाट सभोवताल ताराचे कुंपण तयार केले. त्यावेळी त्या जमिनीवर साधे गवतसुद्धा उगवत नसताना या जमिनीचे भौगोलिक अवलोकन करुन ओलिताखाली एक विहीर आणि चार बोअरवेल खोदून हातच्या जलसिंचनाची व्यवस्था केली. त्यावेळी आंबा, सागवान झाडे लावली. तर सोबत देशी गायी पालन करीत रब्बी पिके हरभरा, तूळ, तीर, येरंडी, सुर्यफुल, मक्याचे उत्पादन घेणे सुरू केले. जमीनीच्या सखल उंच भागानुसार 23 प्लाट तयार करण्यात करून चार एकर जागेत शेडनेट तयार करून पारंपारीक आंतर पिके भाजीपाल्याचे उत्पादन ते घेतायेत तर पांढऱ्या चंदनाची शेतीसुद्धा ते करीत आहेत. यामुळे शंभरच्या वर मजूरांना रोजगार सुद्धा मिळाला आहे. एकंदरीत पारंपारिक धान शेतीला त्यांनी फाटा देत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नवा संदेश यांनी दिला आहे. जर प्रत्येक शेतकरी धानाच्या शेतीसोबत नगदी पिकांकडे वळले तर नक्किच त्यांचीसुद्धा प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही असा संदेशच दादा फुंडे यांनी दिला आहे.

गांडुळ खताचा वापर -

गाईसाठी हवेशीरयुक्त गोठा पध्दतीचे शेड तयार करण्यात आले. त्यामधुन मल, मुतूर एका ठिकाणी जमा होउन संपुर्ण शेतीला पाईप बसवण्याची व्यवस्था केली आहे. गोठ्याला लागुनच गांडुळ खत निर्मिती प्रकल्प सुध्दा बनविण्या आला. आजघडीला दुग्ध व्यवसाय वाढविण्याच्या हेतुने गौर जातीच्या १२ गाई व एक वळु आहे. पशुंच्या खाद्यासाठी नेपीअर गवत, बर्शिमची पेरणी केली जाते.

फळबागेत आंतरपीक -

चार एकर जागेत मल्चिंगव्दारे भाजीपाल्याचे उत्पादन : २ एकर जागेत शेडनेट लावुन काकडी, कारली, चवळी, टोमॅटो, वांगी, भेडी, लवकी, कोहळा, तोंडली, मुळा, पालक, मेथी, गाजर आदि पिकांची उत्पादने घेतले जात आहेत. फळबागेत आंतरपिक म्हणुन टरबुजाची लागवड केली जाते. अहिल्याबाई होळकर शेतवाटिका योजनेतुन १० आर जागेत शेडनेट तयार केले आहे.

नावीन्यपुर्ण शेती -

प्रयोगशील शेतकरी फुंडे आपल्या खैरी येथील शेतीमध्ये नावीन्यपुर्ण उत्पादन घेउन गावातील २५ मजुरांना रोजगाराची संधी मिळवुन देत आहेत. धानाबरोबरच दुग्ध व्यवसाय करून व फलोत्पादन शेतीमधुन लाखो रूपयांचे उत्पादन घेत आहेत. त्यांनी १३ एकराच्या जागेत नवीन तंत्राानाच्या माध्यमातून नावीन्यपुर्ण शेती केली आहे.

हेही वाचा - अगरबत्ती उद्योगाने दिला 200 महिलांना रोजगार; नामांकित ब्रँड कंपनीसोबत करार

Last Updated :Feb 13, 2022, 11:12 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.