ETV Bharat / state

Gautami Patil : 'लोककलेची गौतमी करू नका, अन्यथा..', तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी व्यक्त केली खंत

author img

By

Published : Apr 8, 2023, 4:42 PM IST

Updated : Apr 8, 2023, 5:12 PM IST

गावातील लोककलावंताना आता पूर्वीएवढी मागणी राहिलेली नाही. तमाशासाठी लोक जास्त पैसे देत नाहीत. मात्र दुसरीकडे गौतमी पाटीलसारख्या लावणी कलाकाराला बोलावण्यासाठी गावातील लोक लाखोंनी पैसे द्यायला तयार होतात. यामुळे मूळ लोककलेचा ऱ्हास होतो आहे, असे मत ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी व्यक्त केले आहे.

Raghuveer khedkar Gautami Patil
गौतमी पाटील रघुवीर खेडकर

ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर

अहमदनगर : सध्या गौतमी पाटील या लावणी कलाकाराचे नाव सर्वत्र चर्चेत आहे. ती तिच्या नृत्यामुळे आणि नृत्यातील आकर्षक हावभावांमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. मात्र गौतमी पाटीलबद्दल ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांचे मत जरा वेगळे आहे. बऱ्याच गावचे लोक 100 कलाकार असलेल्या तमाशाला दोन लाख रुपये द्यायला तयार होत नाहीत. मात्र दुसरीकडे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला ते पाच-पाच लाख रुपये देतात, हे काय चाललंय? लोककलेची गौतमी करू नका, अन्यथा महाराष्ट्राचा बिहार होईल, असा घणाघात त्यांनी केला आहे.

'लोककलेचा ऱ्हास करू नका' : पूर्वी गावात जत्रा असली की तमाशा सादरीकरण होत असे. परंतु आता लोक कलावंताना पूर्वीएवढी मागणी राहिली नाही. तमाशासाठी लोक जास्त पैसे देखील देत नाहीत. जुन्या कलाकारांना 2 लाख देण्यासाठीसुद्धा मागेपुढे पाहणारे मात्र गौतमी पाटीलला गावात बोलावण्यासाठी 5 लाख रुपये द्यायला तयार होतात. ही लोककला आहे. तिला लोक कलाच राहू द्या. तिचा तुम्ही ऱ्हास करू नका, असे रघुवीर खेडकर यांनी म्हटले आहे.

पुढाऱ्यांचे लोककलावंतांकडे लक्ष नाही : ते पुढे म्हणाले की, सध्याची मुले कोणत्या वळणावर जात आहेत? आई वडिलांचे लक्ष कुठे आहे? आज तुमच्या मुलाला हरी पाठ येत नाही, परंतु गौतमी पाटीलचे गाणे त्यांना पाठ आहे. हे काय चालले आहे? महाराष्ट्र कोणत्या दिशेने चालला आहे? पुढाऱ्यांचे यावर लक्ष नाही. या गोष्टीवर सगळ्यांनी लक्ष ठेवले पाहिजे. कुठला कलावंत महाराष्ट्राला कोणत्या दिशेला नेत आहे याकडे पुढाऱ्यांनी व पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे, अशी कळकळीची भावना खेडकर यांनी व्यक्त केली आहे. गौतमी पाटीलच्या नृत्याला सध्या चांगली मागणी आहे. परंतु खरा महाराष्ट्र लोक कलावंतांचा आहे. पूर्वी अशा विचित्र हावभाव करणाऱ्या कलाकारांना थारा नव्हता. परंतु अलीकडच्या काळात गौतमी पाटील सारख्या कलाकारांच्या येण्याने सध्याची पिढी कुठे चालली आहे?, असा सवाल रघुवीर खेडकर यांनी केला आहे.

हेही वाचा : Shirdi Airport: साईभक्तांसाठी खुशखबर; शिर्डी विमानतळावर आजपासून नाईट लँडिंगची सुविधा

Last Updated :Apr 8, 2023, 5:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.