ETV Bharat / state

केंद्राने छत्तीसगड मॉडेल राबवल्यास शेतकरी आंदोलन मागे घेतील - मुख्यमंत्री भूपेश बघेल

author img

By

Published : Jan 13, 2021, 6:46 PM IST

अहमदनगर छत्तीसगड मुख्यमंत्री भूपेश बघेल न्यूज
अहमदनगर छत्तीसगड मुख्यमंत्री भूपेश बघेल न्यूज

शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असून शेतकऱ्यांच्या शेती मालाला उचित भाव आमचे सरकार देत आहे. इतकेच नाही तर, आम्ही आमच्या राज्यात शेणही खरेदी करतो. ज्यांच्याकडे गाई नाहीत, तेही शेण विकून आता मोटर सायकली घेताहेत. विमानाने प्रवास करताहेत, असे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले.

अहमदनगर - दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून केंद्र सरकारने जर छत्तीसगडचे मॉडल राबवले तर, शेतकरी आंदोलन मागे घेतील, असा विश्वास छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी आज अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये बोलताना व्यक्त केला. आम्ही निवडणुकीत जनतेला आणि शेतकऱ्यांना जी आश्वासने दिली होती, ती पूर्ण केली आहेत. येथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

केंद्राने छत्तीसगड मॉडेल राबवल्यास शेतकरी आंदोलन मागे घेतील - मुख्यमंत्री भूपेश बघेल

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले,

शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असून शेतकऱ्यांच्या शेती मालाला उचित भाव आमचे सरकार देत आहे. इतकेच नाही तर, आम्ही आमच्या राज्यात शेणही खरेदी करतो. ज्यांच्याकडे गाई नाहीत, तेही शेण विकून आता मोटर सायकली घेताहेत. विमानाने प्रवास करताहेत. देशात सर्वत्र गाय दूध देणारी असल्याने तिला आदराचे स्थान आहे. मात्र, भारतात गाय ही मते देणारी ठरतेय. गाईच्या नावाने देशात राजकारण केले जात असून गोशाळा उघडण्यासाठी अनेकांना निधी दिला गेला. मात्र, त्यातील गाई या कुपोषित झाल्या आहेत. मात्र, गोशाळा चालवणारे गब्बर झालेत, अशी टीका छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केली.

हेही वाचा - पशू आरोग्य सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा – मुख्यमंत्री


महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले,

राज्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी छत्तीसगड सरकारकडून प्रेरणा घ्यावी. गेल्या 15 वर्षांपासून छत्तीसगडमध्ये भाजप सरकार होते. भुपेष बघेल हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना प्रेरणा देत सर्वांना एकत्र आणत भाजप विरोधात आंदोलने केली. येथे 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजप सरकारचा परभाव करत 90 जागांमधील 80 जागांवर काँग्रेसने विजय मिळवला असल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.


जलसंपदामंत्री जयंत पाटील म्हणाले,

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचा समृद्ध वारसा बाळासाहेब थोरात हे सांभाळत आहेत. मला कधीही बाळासाहेब थोरात यांचा फोन आला की, पहिले निळवंडेचे काम आहे असेच वाटते. भाऊसाहेब थोरात, बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे धरण व कालव्यांसाठी ध्यास घेतला असून येत्या 2023-24 पर्यंत निळवंडे धरणच्या कालव्यांची कामे पूर्ण होणार आहेत. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळणार असल्याचे जयंत पाटील म्हणाले. पाण्याचे दुर्भिक्ष्य कमी करणे, हाच महाविकास आघाडी सरकारचे मुख्य उद्देश असून यासाठी वळण बंधार्‍यांना ही स्वतंत्र विभाग सुरू केला आहे. त्या कामांना गती दिली आहे. येथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात जयंत पाटील बोलत होते.

हेही वाचा - महामंडळाच्या बसेसवर 'संभाजीनगर'च्या पाट्या

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.