ETV Bharat / state

Ahmednagar Crime News: पत्नी- सासूचा खून करून फरार झालेल्या घरजावयाची आत्महत्या, खुनानंतर स्वतःच्या आईकडे सोपवली मुलगी

author img

By

Published : Aug 17, 2023, 7:50 AM IST

Updated : Aug 17, 2023, 11:34 AM IST

Ahmednagar Crime News
नगरममध्ये दुहेरी हत्याकांड

अहमदनगर जिल्ह्यातील कात्रड येथे मंगळवारी रात्री पतीने लोखंडी रॉड डोक्यात घालून पत्नी आणि सासूची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पत्नी आणि सासुची हत्या करून फरार झालेल्या आरोपीचा मृतदेह बुधवारी धनगरवाडी येथे आढळून आला आहे.

अहमदनगर : अहमदनगरमध्ये गेल्या काही दिवसात हत्येच्या घटना वाढल्या आहेत. अशातच नगरमध्ये दुहेरी हत्याकांड उघडकीस आले आहे. राहुरी तालुक्यातील कात्रड येथील सागर साळवे आणि नुतन दांगट या दोघांचे लग्न झाले होते. दोघेही एकाच गावातील आहेत. आरोपी सागर हा घरजावई होता. घरजावई म्हणून राहणे आरोपीला पसंत नव्हते. पत्नी माहेरी राहत असल्याने दोघांमध्ये वाद होता. सध्या धोंड्याचा महिना सुरू असल्याने जावई सागरला सासू सुरेखा दांगट यांनी धोंड्याच्या जेवणासाठी दुपारी बोलावले होते.

कौटुंबिक वाद थेट विकोपाला : मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी दुपारी धोंड्याच्या जेवणासाठी गैरहजर राहिला होता. तो रात्री उशिरा घरी आल्यावर कौटुंबिक वाद सुरू झाले. हा वाद थेट विकोपाला गेला. रात्री अकरा वाजता आरोपीने रागाच्या भरात पत्नी नुतन आणि सासू सुरेखा दांगट यांच्या डोक्यात लोखंडी रॉडचे प्रहार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नी व सासूला सोडून आरोपी त्याच्या दीड वर्षाच्या मुलीला बरोबर घेऊन घराबाहेर पडला.



आरोपीच्या कुटुंबीयांना शंका : कात्रड गावातच आरोपीचा भाऊ गणेश साबळे यांचे कुटुंब राहते. रात्री साडेअकरा वाजता आरोपी सागरने त्याची दीड वर्षाची मुलगी भक्ती हिला भाऊ गणेश, भावजय पल्लवी आणि आई ताराबाई साबळे यांच्या स्वाधीन केले. एवढ्या रात्री मुलीला घेऊन कशाला आलास? असे भावाने विचारल्यावर मुलगी रडत होती म्हणून तिला आणले, असे सांगून आरोपी लघुशंकेच्या बहाण्याने फरार झाला. भावाने आरोपीला फोन लावल्यावर मोबाईल 'स्वीच्ड ऑफ' लागला. आरोपीच्या कुटुंबीयांना शंका आल्याने भाऊ, भावजय यांनी आरोपीच्या सासूचे घर गाठले. त्यानंतर घटना समोर आली. गणेश साबळे यांनी तत्काळ राहुरी पोलीस ठाण्यात माहिती कळविली. पोलीस उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपूजे, सहायक पोलीस निरीक्षक राजू लोखंडे, उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घरातील दोन्ही मृतदेह नगर येथे जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.


आरोपीचाही मृतदेह आला आढळून : दरम्यान, मयत सुरेखा दांगट यांचे बंधू भास्कर टेमक यांच्या तक्रारीवरून राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी सागर विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर तातडीने पोलिसांनी आपले दोन पथक तयार करत आरोपीच्या शोधासाठी रवाना केले होते. आरोपी सागरचा शोध सुरू असतांना अहमदनगर तालुक्यातील धनगरवाडी येथील शेतकरी शिकारे यांच्या शेतात आरोपी सागर साबळे याचा मृतदेह पोलिसांना आढळून आला आहे. या प्रकरणी अहमदनगर एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा :

  1. Delhi Crime News : बॉयफ्रेंड लग्न करत नाही म्हणून केली त्याच्या मुलाची हत्या, कॉल करून म्हणाली..
  2. Wife Killing Case Nanded : हुंड्यासह मोटारसायकलीसाठी पत्नीचा खून करणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा
  3. Suicide Because Of Dowry : हुंडा न देऊ शकल्यामुळे तरुणीची आत्महत्या, व्हिडिओद्वारे व्यथा मांडली
Last Updated :Aug 17, 2023, 11:34 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.