ETV Bharat / state

Thackeray Faction : ठाकरे गटाला दिलासा; 'या' मोठ्या नेत्याची घरवापसी, पण...

author img

By

Published : Aug 20, 2023, 8:04 PM IST

शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे 23 ऑगस्टला ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. मतदार संघातील जनतेच्या मागणीमुळे मी 2024 ला निवडणुक लढणार असल्याचे वाकचौरे यांनी सांगितले. मात्र, त्यांच्या या प्रवेशावर स्थानिक ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Bhausaheb Vakchoure
Bhausaheb Vakchoure

भाऊसाहेब वाकचौरे यांची प्रतिक्रिया

शिर्डी(अहमदनगर) : माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे पुन्हा स्वगृही परतणार आहेत. भाऊसाहेब वाकचौरे 23 ऑगस्टला ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. 2009 मध्ये भाऊसाहेब वाकचोरे यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी रामदास आठवले यांचा पराभव केला होता. 2009 मध्ये शिवसेनेने वाकचौरे यांना पहिल्यांदा उमेदवारी जाहीर केली होती. त्यावेळी भाऊसाहेब वाकचौरे युतीचे उमेदवार होते, तर रामदास आठवले आघाडीचे उमेदवार होते. त्यावेळी वाकचौरे यांनी रामदास आठवले यांचा पराभव करुन खासदारकी मिळवली होती. मात्र, त्यांनी नंतर शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करत 2014 ला काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तेव्हा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. वाकचौरे यांनी शिवसेनेशी गद्दारी केल्याने शिवसैनिकांनी त्यावेळी त्यांच्याविरोधात आंदोलनही केले होते.

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश : वाकचौरे यांना शिवसेनेने खासदारकी दिली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी 2014 साली लोकसभेची निवडणूक लढवली. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. त्यावेळी सदाशिव लोखंडे यांनी अवघ्या 17 दिवसांत खासदारपदावर मजल मारली होती. वाकचौरे यांना 2019 मध्ये भाजप-सेना युतीमुळे अपक्ष खासदार म्हणून निवडणूक लढवावी लागली होती. आता राज्यातील राजकीय समीकरणे बदलली असून खासदार लोखंडे शिंदे गटात गेल्याने वाकचौरे यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. वाकचौरे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत असल्याने शिर्डी मतदारसंघ ठाकरे गटाकडेच राहण्याची शक्यता आहे. 23 ऑगस्ट रोजी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वाकचौरे मुंबईत प्रवेश करणार आहेत.

वाकचौरेंच्या प्रवेशावर नाराजी : माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे पुन्हा ठाकरे गटात परतत असले तरी त्यांना ठाकरे गटातील शिवसैनिक कितपत स्वीकारतील याबाबत साशंकता आहे. कारण 2014 मध्ये वाकचौरे यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. वाकचौरे पुन्हा ठाकरे गटात येणार असल्याची माहिती मिळताच ठाकरे गटातील शिवसैनिकांनी संगमनेरमध्ये बैठक घेऊन वाकचौरे यांच्या प्रवेशावर नाराजी व्यक्त केली. एकीकडे भाऊसाहेब वाकचौरे ठाकरे गटात प्रवेश करण्यापूर्वी कार्यकर्त्यांची मोट बांधत असताना दुसरीकडे त्यांच्या प्रवेशाला विरोध होत आहे. त्यामुळे वाकचौरे यांच्या प्रवेशाने पक्षाला फायदा होणार की तोटा हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.

साईबाबा संस्थानचे विश्वस्त : भाऊसाहेब वाकचौरे हे शिवसेनेचे माजी खासदार आहेत. सध्या ते भाजपामध्ये आहेत. विशेष म्हणजे त्यांनी साईबाबा संस्थानचे विश्वस्तपदही भूषवले आहे. 2019 मध्ये शिवसेनेने विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना तिकीट दिले होते. त्यामुळे वाकचौरे यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती.


हेही वाचा -

Shirdi Saibaba : साईंची नगरी गर्दीने फुलून गेली; सलग सुट्ट्यांमुळे लाखो भाविक शिर्डीत दाखल

Sanjay Raut : चंद्रशेखर बावनकुळेंना म्हणावं खुशाल कोर्टात जा, मी वकील देतो; संजय राऊतांचा टोला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.