ETV Bharat / state

ओव्हरटेक करताना धावत्या कारवर कोसळला ट्रक; भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 18, 2023, 7:10 AM IST

Accident on Nashik Pune Highway : पुणे नाशिक महामार्गावर संगमनेर तालुक्यात कार आणि ट्रकचा भीषण अपघात झालाय. या अपघातातील कारमधील 4 जणांचा जागीच मृत्यू झालाय.

Accident on Nashik Pune Highway
Accident on Nashik Pune Highway

संगमनेर (अहमदनगर) Accident on Nashik Pune Highway : संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावर असलेल्या चंदनापुरी गावापासून काही अंतरावर रविवारी रात्री भीषण अपघात झालाय. अतिशय भीषण पद्धतीनं घडलेल्या या घटनेत धावता ट्रक बाजूनं चाललेल्या कारवर कोसळल्यानं कार मधील चौघांचा मृत्यू झालाय. या अपघातात एक महिला बचावली आहे. या घटनेनंतर चंदनापुरीच्या ग्रामस्थांनी तात्काळ अपघातस्थळी धाव घेत जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल केलं.

कसा झाला अपघात : नाशिकच्या दिशेनं निघालेल्या आयशर टेम्पोला ओव्हरटेक करत असताना अचानक हा ट्रक त्या कारवर कोसळला. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात कंपनीच्या इटीयोस कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. या घटनेनंतर चंदनापुरी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत तातडीनं मदत कार्य सुरू केलं. त्यामुळं एका महिलेचा जीव वाचला. मात्र, एका दोन वर्षीय चिमुकल्या मुलीसह चार जणांचा या अपघातात बळी गेला. या अपघातात ओजस्वी धारणकर (वय 2 वर्ष), आशा सुनील धारणकर (वय 42), सुनील धारणकर (वय 65 वर्ष) व अभय सुरेश विसाळ (वय 48 वर्ष) या चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, अस्मिता अभय विसाळ या महिलेला ग्रामस्थांच्या मदतीनं वाचविण्यात यश आलंय. या महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

माहिती मिळताच संगमनेर पोलीस घटनास्थळी दाखल : या घटनेची माहिती मिळताच संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्यासह तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. या अपघातामुळं नाशिककडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून तासाभरात वाहतूक सुरळीत केली. या अपघातानंतर संगमनेरसह अकोले तालुक्यात शोककळा पसरलीय.

हेही वाचा :

  1. लष्करी भरतीचे स्वप्न राहिले अपूर्णच.. ऑटोला टँकरने चिरडल्याने ९ तरुणांचा मृत्यू
  2. मुंबई-नाशिक महामार्गावर भरधाव कारचा भीषण अपघात; चालक ठार, दोन गंभीर
  3. गुजरात: अपघातानंतर गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या ट्रकचा स्फोट; स्कूल बससह ४ वाहने जळाली
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.