ETV Bharat / state

Sai Baba Darshan Q Complex : साई भक्तांसाठी ११२ कोटींचे हायटेक दर्शन क्यू कॉम्प्लेक्स लवकरच खुले होणार

author img

By

Published : Mar 11, 2023, 10:55 PM IST

Updated : Mar 11, 2023, 11:01 PM IST

Sai Baba Darshan Q Complex
Sai Baba Darshan Q Complex

साई संस्थानने 112 कोटी रुपये खर्चून 6 एकर जागेवर हायटेक दर्शन क्यू कॉम्प्लेक्स बांधले आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दर्शनासाठी लागणाऱ्या रांगेतुन आता सुटका मिळणार आहे. सुमारे पाच वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या इमारतीचे काम आता पूर्ण झाले आहे.

साई भक्तांसाठी ११२ कोटींचे हायटेक दर्शन क्यू कॉम्प्लेक्स लवकरच खुले होणार

शिर्डी : साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रस्त्यावरील लांबच लांब रांगा आणि साई मंदिरात प्रवेशासाठी होणारा त्रास यापासून दिलासा मिळणार आहे. साई संस्थानने 6 एकर जागेवर 112 कोटी रुपये खर्चून हायटेक दर्शन क्यू कॉम्प्लेक्स बांधले आहे. जवळपास पाच वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या इमारतीचे काम आता पूर्ण झाले आहे.

पंतप्रधानांना निमंत्रण : या नवीन दर्शन क्यू कॉम्प्लेक्समध्ये एकाच वेळी 12 ते 18 हजार भाविक बसू शकतात. मोठ मोठे वातानुकूलीत एसी हॉल, बायोमेट्रिक दर्शन पास, व्हीआयपी व्यवस्था, केटरिंग, कॅंटिंग सुविधा, टॉयलेट, बुक स्टॉल, लाडू प्रसाद हे सर्व एकाच ठिकाणी उपलब्ध असणार आहे. या दर्शन क्यू कॉम्प्लेक्सच्या उद्घाटनासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याला राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दुजोरा दिला आहे. साईट्रस्ट, राज्य सरकारच्या वतीने पंतप्रधानांना निमंत्रण पाठवण्यात येत आहे.

रांगेतून होणार भाविकांची सुटका : निळवडे धरणाचे लोकार्पण आणि श्रीसाईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थापन समितीच्या दर्शन रांगेच्या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यापुर्वी निमंत्रण दिले आहे. राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रधानमंत्र्यांना विनंती केली असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. शिर्डी साईबाबांचे देश-विशात कोट्यवधी भक्त असून, सुट्ट्या, सणांच्या दिवशी विक्रमी गर्दी होत असते. भाविकांना रस्त्यावर दर्शन रांगेत तासनतास ताटकळत उभे राहावे लागते. ना बसण्याची पुरेशी व्यवस्था ना चहापाणची. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या त्रासातून आता भाविकांची सुटका होणार आहे.



आंदोलन मागे घेण्याची विनंती - फडणवीस : औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यावरून खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादेत आंदोलन सुरू केले आहे. नाव बदलाच्या वादामुळे तेथील व्यवसाय आणि पर्यटनावर परिणाम होण्याची भीती व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जे आंदोलन करत आहेत त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती करण्यात आली आहे. आज अहमदनगर जिल्ह्यात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

शांतता राखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न: नाव बदलण्याच्या बाबतीत प्रक्रिया पूर्ण झाली आहे. शेवटी भारतात फक्त संभाजी राजांचा उदय होईल आणि औरंगजेब करू शकत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी शांतता राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अहमदनगर जिल्ह्यातील कन्हैया कृषी विस्तार प्रकल्पाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

हेही वाचा - ED summons to Hasan Mushrif : हसन मुश्रीफ यांच्यावर अटकेची टांगती तलवार? ईडीने बजावले समन्स

Last Updated :Mar 11, 2023, 11:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.