Tokyo Olympics : पंतप्रधान मोदींशी संवाद साधताना महिला हॉकी संघाला अश्रू अनावर, पाहा व्हिडिओ

author img

By

Published : Aug 6, 2021, 3:35 PM IST

Updated : Aug 6, 2021, 3:48 PM IST

Tokyo Olympics 2020: PM narendra Modi calls up Indian Women's hockey team after match with Britain

ग्रेट ब्रिटनविरुद्धच्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाचे पदकाचे स्वप्न अधुरे राहिले. यामुळे भारतीय खेळाडूंना मैदानावर अश्रू रोखता आले नाहीत. याच पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला हॉकी संघाला फोन करून धीर देण्याचा प्रयत्न केला.

टोकियो - टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघाचा ग्रेट ब्रिटनकडून पराभव झाला. ब्रिटनने भारतीय संघाचा ४-३ असा पराभव करत कास्य पदकावर नाव कोरले. भारतीय संघाचे या पराभवानंतर ऑलिम्पिकमध्ये पदकाचे स्वप्न अधुरे राहिले. यामुळे भारतीय खेळाडूंना मैदानावर अश्रू रोखता आले नाहीत. गोलकिपर सविता पुनिया, वंदना कटारिया, कर्णधार राणी रामपाल आणि नेहा गोयल यांच्यासमवेत संघातील सर्व खेळाडू भावूक झाले होते. याच पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला हॉकी संघाला फोन करून धीर देण्याचा प्रयत्न केला.

मोदी भारतीय महिला संघाला बोलताना म्हणाले की, "तुम्ही चांगला खेळ केलात. चिंता करू नका, देशाला तुमचा गर्व आहे. तुम्ही घेतलेली मेहनत देशातील मुलींसाठी प्रेरणादायी आहे."

व्हिडिओ पाहा

मोदी यांच्याशी फोनवर बोलताना महिला खेळाडूंना अश्रू अनावर झाले. त्यावर मोदींनी त्यांना, तुम्ही रडू नका, असे सांगत धीर दिला. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पराभवामुळे निराश झालेल्या महिला हॉकी संघाला प्रोत्साहन देण्यासाठी मोदींनी ट्वीट देखील केलं होतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विट

मोदी त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात की, मुलींच्या कामगिरीने नव्या भारताची भावना प्रदर्शित केली आहे. या महान कामगिरीची आम्हाला नेहमी आठवण राहील. आपण महिला हॉकीमध्ये खूप कमी फरकानं पदक गमावलं. परंतु हा संघ नवीन भारताची भावना प्रतिबिंबित करतो.

ग्रेट ब्रिटनच्या खेळाडूंनी देखील भारतीय संघाचं केलं कौतुक

भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत दमदार कामगिरी केली. कास्य पदकाच्या लढतीनंतर ग्रेट ब्रिटनच्या खेळाडूंनी भारतीय संघाच्या कामगिरीचे कौतुक केलं आणि भारतीय खेळाडूंचा टाळ्या वाजवत सन्मान केला. तसेच ग्रेट ब्रिटनच्या महिला खेळाडूंनी अश्रू अनावर झालेल्या भारतीय महिला खेळाडूंना धीर दिला. याशिवाय ग्रेट ब्रिटनच्या हॉकी संघाच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरुनही भारतीय संघाच्या खेळाचे कौतुक करण्यात आलं आहे.

हेही वाचा - Tokyo Olympics : भारताला गोल्फमध्ये मिळणार सुवर्ण पदक? अदिती अशोक पदकाजवळ पोहोचली

हेही वाचा - पदक हुकल्यानंतर आश्रू अनावर; ब्रिटनच्या खेळाडूंनी टाळ्या वाजवत केला भारतीयांचा सन्मान

Last Updated :Aug 6, 2021, 3:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.