ETV Bharat / sports

National Subjunior Chess Tournament : 38 व्या राष्ट्रीय सबज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेत औरंगाबादची तनीषा बोरामणीकर विजेती

author img

By

Published : Mar 15, 2022, 6:50 PM IST

नवी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या 38 व्या राष्ट्रीय सबज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेत ( 38th National Subjunior Chess Tournament ) औरंगाबादच्या तनीषा बोरामणीकर ( Tanisha Boramanikar ) हिने साडेसात गुणांसह चमकदार कामगिरी करताना विजेतेपद पटकावले आहे. त्याचबरोबर औरंगाबादसह महाराष्ट्राच्या मानात तुरा रोवला आहे.

Tanisha Boramanikar
Tanisha Boramanikar

औरंंगाबाद : 38 व्या राष्ट्रीय सबज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेत ( 38th National Subjunior Chess Tournament ) देशभरातून 293 खेळाडू सहभागी झाले होते. 16 वर्षांखालील या स्पर्धेत तनीषाला आठवे मानांकन ( Tanisha ranked eighth ) देण्यात आले होते. तनीषाने पहिल्या दोन फेर्‍यांमध्ये हरियानाच्या देवांशी आणि रिधिका या दोन्ही खेळाडूंवर सहज विजय मिळविला. तिसर्‍या फेरीत महाराष्ट्राची सिवा कुलकर्णी व चौथ्या फेरीत उत्तर प्रदेशच्या सुभी गुप्ता यांच्याबरोबर झालेली लढत तनीषाने बरोबरीत सोडवली. तर पाचव्या फेरीत केरळच्या पौर्णिमा एस. हिला नमवत अर्ध्या गुणाची आघाडी घेतली. तनीषाने दहाव्या फेरीत तामिळनाडूच्या वकचेरी मोहियाचा पराभव केला. तसेच सातव्या आशियाई युवा चॅम्पियन एम. मलिका आणि प. बंगालच्या अनुष्का गुप्ता यांच्यासोबत बरोबरी साधत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केला.

38 व्या राष्ट्रीय सबज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेत औरंगाबादची तनीषा बोरामणीकर विजेती

स्पर्धेतून घेणार होती माघार -

शहरातील इंग्रजी शाळेत इयत्ता दहावी शिकणाऱ्या तनीषाची आवघ्या दहा दिवसांवर बोर्डाची परीक्षा असल्याने तिने स्पर्धेला न जाण्याचा निर्णय घेतला होता. परंतु तिच्या आई-वडील व शिक्षकांनी तिला स्पर्धेला जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे तनीषाने स्पर्धेला जाण्याचा निर्णय घेतला. जागतिक महिला दिनाच्या ( World Women's Day ) दिवशी तनीषाला विजेतेपद मिळाले. त्यामुळे महिला दिनानिमित्त मोठं गिफ्ट मिळाल्याची भावना तनीषाची आई रेणुका यांनी व्यक्त केली.

आतापर्यंत तब्बल तेरा पदकांची कमाई -

तनीषाने 4 आंतरराष्ट्रीय पदके, 9 राष्ट्रीय पदके आणि अनेक राज्य स्पर्धा जिंकल्या आहेत. राष्ट्रकुल बुद्धिबळ स्पर्धेत 2018 मध्ये रौप्य पदक, थायलंड येथे सुवर्ण पदक आणि उझबेकिस्तान येथे कांस्य पदकाची कमाई केली आहे. नुकतेच जुलै 2021 मध्ये पार पडलेल्या ऑनलाइन आशियाई शालेय बुद्धिबळ स्पर्धेत ( Online Asian School Chess Tournament ) सुवर्णपदक पटकावले आहे. तसेच दिल्ली येथे प्रतिष्ठित राष्ट्रीय सबज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये देखील सुवर्णपदक जिंकले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.