ETV Bharat / sports

मर्सिडिजच्या ड्रायव्हरने जिंकली ऑस्ट्रिया फॉर्म्युला वनची शर्यत

author img

By

Published : Jul 6, 2020, 2:15 PM IST

पाच सेकंदाच्या 'टाइम पेनल्टी'मुळे विश्वविजेत्या लुईस हॅमिल्टनला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. 20 पैकी नऊ वाहनचालक शर्यत पूर्ण करू शकले नाहीत. यामध्ये मॅक्स व्हर्स्टापेन आणि रेड बुल्सचा अलेक्झांडर अल्बॉन यांचा समावेश होता. हॅमिल्टनला मागे टाकण्याच्या प्रयत्नात अल्बॉन बाहेर गेला. त्यामुळे ब्रिटिश ड्रायव्हरलाही त्रास सहन करावा लागला.

Valtteri bottas won the first race of the season at  austria grand prix
मर्सिडिजच्या ड्रायव्हरने जिंकली ऑस्ट्रिया फॉर्म्युला वनची शर्यत

नवी दिल्ली - फिनलँडच्या वाल्टेरी बोटासने ऑस्ट्रिया फॉर्म्युला वन शर्यतीचे विजेतेपद पटकावले. बोटासने दिमाखदार पद्धतीने मर्सिडिजसाठी फॉर्म्युला वन हंगामाची पहिली शर्यत जिंकली आहे.

पाच सेकंदाच्या 'टाईम पेनल्टी'मुळे विश्वविजेत्या लुईस हॅमिल्टनला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. 20 पैकी नऊ वाहनचालक शर्यत पूर्ण करू शकले नाहीत. यामध्ये मॅक्स व्हर्स्टापेन आणि रेड बुल्सचा अलेक्झांडर अल्बॉन यांचा समावेश होता. हॅमिल्टनला मागे टाकण्याच्या प्रयत्नात अल्बॉन बाहेर गेला. त्यामुळे ब्रिटिश ड्रायव्हरलाही त्रास सहन करावा लागला.

या धडकीसाठी हॅमिल्टनला जबाबदार धरण्यात आले होते. त्यामुळे त्याला पाच सेकंदाचा दंड मिळाला. याआधी शनिवारी एका पात्रता स्पर्धेत त्याला दंडही ठोठावला होता.

एका वेळी दोन मर्सिडीज ड्रायव्हर्स अव्वल स्थानासाठी स्पर्धा करत होते. परंतु हॅमिल्टनच्या शेवटच्या मिनिटाच्या पेनल्टीने फेरोरीच्या चार्ल्स ललार्कने दुसरे स्थान मिळवले. तर, मॅकलरेनचा लँडोला तिसऱ्या स्थानावर समाधाना मानावे लागले.

रेनोचा कार्लोस सेन्झ ज्युनियर पाचव्या, रेसिंग पॉईंटचा सर्जिओ पेरेझ सहावा, टॉरे रोसोचा पियरे गास्ले सातवा, रेनोचा एस्टाबेन ओकोन आठवा, अल्फा रेसिंगचा अँटोनियो जिओविनाझी नववा आणि फेरारीचा सेबस्टियन व्हेटेल दहाव्या स्थानावर राहिला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.