ETV Bharat / sports

US Open Final : अल्कारेझने टियाफोचा पराभव करून प्रथमच गाठली अंतिम फेरी

author img

By

Published : Sep 10, 2022, 3:14 PM IST

Carlos Alcarez
अल्कारेझ

कार्लोस अल्कारेझ पहिल्यांदाच यूएस ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचला ( Carlos Alcarez in the US Open final ) आहे. येथे त्याचा सामना कॅस्पर रुडशी होणार आहे. हा ग्रँडस्लॅम विजेता टेनिस क्रमवारीत जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा खेळाडूही बनेल.

न्यूयॉर्क: स्पेनच्या कार्लोस अल्काराझने ( Carlos Alcaraz ) यूएस ओपनच्या अंतिम फेरीत ( US Open Final ) धडक मारली आहे. त्याने उपांत्य फेरीत अमेरिकेच्या फ्रान्सिस टियाफोला ( Frances Tiafoe ) नॉकआउटमध्ये पराभूत केले. 19 वर्षीय अल्कारेझने उपांत्य फेरीचा सामना 6-7, 6-3, 6-1, 6-7, 6-3 अशा फरकाने जिंकला. तो पहिल्यांदाच यूएस ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. अंतिम फेरीत त्याचा सामना कॅस्पर रुडशी ( Casper Ruud ) होणार आहे. हा ग्रँडस्लॅम विजेता टेनिस क्रमवारीत जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा खेळाडूही बनेल. कॅस्पर रुडने उपांत्य फेरीत रशियाच्या कॅरेन काचानोव्हचा 7-6, 6-2, 5-7, 6-2 असा पराभव केला.

या सामन्यात दोन्ही खेळाडूंनी चार तास 18 मिनिटे झुंज दिली, पण शेवटी अल्कारेझने बाजी मारली. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच त्याची जेतेपदाच्या दावेदारांमध्ये गणना केली जात होती. यूएस ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचणारा तो राफेल नदालनंतरचा दुसरा स्पॅनिश खेळाडू ( Second Spanish player to reach US Open final ) आहे. पराभवानंतर टियाफोने म्हटले आहे की, लवकरच तो जबरदस्त पुनरागमन करणार आहे.

दुसरीकडे, कॅस्पर रुडने पहिल्या सेटमध्ये 55 शॉट्स पर्यंत चाललेला पॉइंट जिंकून आपला वेग कायम राखला. तसेच उपांत्य फेरीत रशियाच्या कॅरेन खाचानोव्हचा ( Karen Khachanov ) पराभव करून स्पर्धेतील विजेतेपदाच्या लढतीत प्रवेश केला. नॉर्वेच्या 23 वर्षीय रुडने हा सामना 7-6(5), 6-2, 5-7, 6-2 असा जिंकला आणि अशा प्रकारे वर्षभरात दुसऱ्यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. जूनमध्ये झालेल्या फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत तो राफेल नदालकडून पराभूत झाला होता.

हेही वाचा - Aaron Finch Announces Retirement : अ‍ॅरॉन फिंचने केली निवृत्तीची घोषणा, 'या' दिवशी खेळणार शेवटचा सामना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.