ETV Bharat / sports

Tokyo Olympics 2020 Live : बॉक्सर विकास कृष्णचे ऑलिम्पिक आव्हान संपुष्टात, महिला हॉकीत भारताचा पराभव

author img

By

Published : Jul 24, 2021, 9:04 AM IST

Updated : Jul 24, 2021, 7:36 PM IST

विकास कृष्णला पराभवाचा धक्का
Tokyo Olympics 2020 Live : भारताचा अनुभवी बॉक्सर विकास कृष्णचे आव्हान संपुष्टात

19:34 July 24

महिला हॉकीमध्ये भारताची निराशाजनक सुरुआत, नेदरलँडने 5-1 ने हरवले

टोकियो - महिला हॉकी गट अ  मधील पहिल्या सामन्यात नेदरलँडने भारतीय संघाला 5 विरुद्ध 1 गोलने हरवले.  भारताकडून कर्णधार रानीने एकमेव गोल केला. पहिल्या तीन क्वार्टरपर्यंत स्कोर 1-1  बरोबरीत होता,  मात्र त्यानंतर नेदरलँडच्या महिलांनी सामन्यात जोरदार पुनरागमन करत सलद चार गोल नोंदवून स्कोर 5-1 वर पोहचवला. या सामन्यातील विजयाबरोबरच  नेदरलँड हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये विजयी सुरुवात केली आहे. 

18:16 July 24

भारत-नेदरलँड्स महिला हॉकी सामन्यात दुसऱ्या कॉर्टरमध्ये भारतीय संघ पिछाडीवर

भारत-नेदरलँड्स महिला हॉकी सामन्यात दुसऱ्या कॉर्टरमध्ये भारतीय संघ पिछाडीवर पडला असून तिसऱ्या व चौथ्या कॉर्टरमध्ये ही पिछाडी भरुन काढून गोल्समध्ये आघाडी घेण्याचा भारतीय संघ प्रयत्न करेल.

16:43 July 24

विकास कृष्णला पराभवाचा धक्का

भारताचा अनुभवी बॉक्सर विकास कृष्णला पराभवाचा धक्का बसला. 69 किलो वजनी गटाच्या 32 राउंडमध्ये जपानच्या सेवोनरेट्स ओकाजावा याने विकासचा पराभव केला.  

15:11 July 24

सुतीर्था मुखर्जीची संघर्षपूर्ण सलामी

भारतीय महिला टेबल टेनिसपटू सुतीर्था मुखर्जीने दुसरी फेरी गाठली आहे. तिने पहिल्या फेरीत स्विडनच्या खेळाडूचा 5-11, 11-9, 11-13, 9-11, 11-3, 11-9, 11-5 असा पराभव केला. 

14:21 July 24

मनिका बत्रा दुसऱ्या फेरीत

भारताची स्टार टेबल टेनिसपटू मनिका बत्रा हिने दुसरी फेरी गाठली आहे. मनिकाने एकेरीत ब्रिटेनच्या टीन टीन हो हिचा 4-0 ने पराभव केला. मनिकाने 11-7, 11-10, 11-10, 11-9 असा विजय मिळवला. हा सामना 30 मिनिटे चालला.  

13:38 July 24

सौरभ चौधरीचे पदक हुकले, 10 मीटर एअर पिस्टलच्या फायनलमध्ये पराभूत

टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदकाचा प्रबळ दावेदार असणारा नेमबाज सौरभ चौधरीचे पदक हुकलं आहे. सौरभ चौधरी 10 मीटर एअर पिस्टलच्या फायनलमधून बाहेर पडला आहे. तो पात्रता फेरीत आघाडीवर होता मात्र फायनलमध्ये सातवे स्थान मिळाल्याने तो स्पर्धेबाहेर गेला आहे.  

12:55 July 24

सात्विकसाईराज रांकिरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडी दुसऱ्या फेरीत

भारतीय बॅडमिंटन पुरुष दुहेरी जोडी सात्विकसाईराज रांकिरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी जी यांग आणि वांग ची लिन या जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या जोडीचा पराभव केला.

12:55 July 24

सुमित नागल पुरूष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत

सुमित नागलने डेनिस इस्तोमिनचा 6-4, 6-7, 6-4 असा  पराभव करत पुरुष एकेरीची दुसरी फेरी गाठली.  

12:04 July 24

भारताने पदकाचे खाते उघडले, मीराबाई चानूने रचला इतिहास

वेटलिफ्टिंग- महिला ४९ किलोमध्ये भारताच्या मीराबाई चानूला रौप्य पदक

11:39 July 24

दीपिका-प्रविण जोडीचे आव्हान संपुष्टात

दीपिका कुमारी आणि प्रविण जाधव या भारतीय मिश्र दुहेरी तिरंदाज जोडीचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपूष्टात आले. अॅन सॅन आणि किम जे डीक या कोरियन जोडीने भारतीय जोडीचा 4-2 ने पराभव केला.  

11:35 July 24

बी साई प्रणीत पहिल्या फेरीत गारद

भारताचा स्टार बॅडमिंटनपटू बी साई प्रणीतला पहिल्या फेरीत गाशा गुंडाळावा लागला. इज्राइलच्या झिल्बेरमन मिशाने साई प्रणीतचा 21-17, 21-15 असा पराभव केला.  

11:06 July 24

नेमबाज सौरभ चौधरी मेडल राउंडसाठी पात्र

जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या भारताचा युवा नेमबाज सौरभ चौधरी 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात मेडल राउंडमध्ये पोहोचला आहे. त्याने पात्रता फेरीत 586 गुणांची कमाई केली. तो या प्रकारात अव्वलस्थानी राहिला. दुसरीकडे भारताचा अभिषेक वर्माला 575 गुणांची कमाई करता आली. तो मेडल राउंडसाठी अपात्र ठरला.  

09:52 July 24

टेबल टेनिस : भारतीय जोडी मनिका-शरथ पहिल्याच फेरीत गारद

टेबल टेनिसमध्ये भारताची मिश्र दुहेरी जोडी मनिका बत्रा आणि शरथ कमल पहिल्याच फेरीत पराभूत झाले आहेत. चीनच्या लिन युन त्झू आणि चेन चिंग या जोडीने भारतीय जोडीचा राऊंड ऑफ 16 च्या सामन्यात 4-0 ने पराभव केला. 27 मिनिटे चाललेल्या सामन्यात चीनच्या जोडीने 11-8, 11-6, 11-5, 11-4 अस सहज विजय मिळवला.

09:40 July 24

टोकियो ऑलिम्पिकमध्ये चीनने जिंकले पहिले पदक

टोकियो ऑलिम्पिकमध्ये चीनने पहिले सुवर्णपदक जिंकले. चीनच्या यांग किआन हिने 10 मीटर एअर रायफल प्रकारामध्ये सुवर्ण कामगिरी केली. तिने 251.8 च्या गुणांसह ऑलिम्पिक विक्रम प्रस्थापित करत सुवर्णपदकाला गवसणी घातली.  

09:36 July 24

भारतीय ज्युडो महिला खेळाडू सुशीला देवी पराभूत

भारतीय ज्युडो महिला खेळाडू सुशीला देवी 48 किलो वजनी गटात पराभूत झाली. हंगरीच्या सेर्नोविक्जकीने तिचा पराभव केला. हा राउंड एलिमिनेशन होता, यात पराभूत होणारा खेळाडू मेडल राउंडमधून बाहेर पडतो. सुशीला देवी मेडल राउंडमधून बाहेर पडली आहे.  

09:30 July 24

भारतीय पुरूष हॉकी संघाची विजयी सलामी

भारतीय हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये विजयी सलामी दिली. भारताने न्यूझीलंडचा 3-2 ने पराभव केला. हरमनप्रीत सिंह याने दोन गोल (26 आणि 33व्या मिनिटाला) केले. तर रुपिंदर पाल सिंहने 10व्या मिनिटाला चेंडू डागला. न्यूझीलंडकडून केन रसेल (6व्या मिनिटाला), स्टीफन जेनेस (43व्या मिनिटाला) यांनी प्रत्येकी एक-एक गोल केला. भारताचा पुढील सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध रविवारी होणार आहे.  

09:25 July 24

भारतीय महिला नेमबाजांचे अपयश

महिला 10 मीटर एअर रायफलमध्ये मेडल राउंड गाठण्यास अपूर्वी चंदेला आणि इलावेनिल वलारिवान यांना अपयश आले. इलावेनिल वलारिवान 16व्या तर अपूर्वी चंदेला 36व्या स्थानी राहिली. दरम्यान, टॉपचे 8 खेळाडू मेडल राउंडसाठी पात्र ठरतात. या प्रकारात नॉर्वेच्या खेळाडूने पहिले, कोरियाच्या खेळाडूने दुसरे तर यूएसच्या खेळाडूने तिसरे स्थान पटकावले.  

09:16 July 24

नौकानयन : भारतीय खेळाडू हिट्स फेरीत पराभूत

नौकानयन लाइटवेट पुरुष डबल स्कल्समध्ये भारतीय खेळाडू पाचव्या स्थानावर राहिले. हा स्कल्स त्यांनी 06: 40: 33 इतका वेळ घेत पूर्ण केला. त्यामुळे ते सेमीफाइनलसाठी पुढे जाऊ शकले नाहीत. असे असले तरी अर्जुन जाट लाल आणि अरविंद सिंह या जोडीला आणखी एक संधी आहे. ते रेपेचेज राउंडमधून कमाल करू शकतात.   

08:58 July 24

भारतीय तिरंदाज मिश्र जोडी उपांत्यपूर्व फेरीत

दीपिका कुमारी आणि महाराष्ट्राचा प्रविण जाधव ही मिश्र दुहेरी जोडी उपांत्यपूर्व फेरीत पोहोचली आहे. भारतीय जोडीने चीनच्या जोडीचा पराभव केला. सुरूवातीला 1-3 च्या पिछाडीनंतर भारतीय जोडीने 3-3 अशी बरोबरी साधली. त्यानंतर अखेरच्या क्षणी 10 गुण मिळवत चीनच्या ताइपे जोडीचा 5-3 ने पराभव केला. 

Last Updated :Jul 24, 2021, 7:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.