ETV Bharat / sports

Tokyo Olympics : भारतीय तिरंदाज दीपिका कुमारीची उपांत्यपूर्व फेरीत धडक

author img

By

Published : Jul 30, 2021, 8:00 AM IST

Updated : Jul 30, 2021, 8:58 AM IST

भारतीय तिरंदाज दीपिका कुमारीने रशियाच्या पेरोवा हिचा 6-5ने पराभव करत इतिहास रचला आहे. याचबरोबरच दीपिकाने क्वार्टर फाइनलमध्ये जागा बनवली आहे.

Deepika kumari
भारतीय तीरंदाज दीपिका कुमारी

टोकियो (जपान) - भारतीय तिरंदाज दीपिका कुमारीने रशियाच्या पेरोवा हिचा 6-5ने पराभव करत इतिहास रचला आहे. याचबरोबरच दीपिकाने क्वार्टर फाइनलमध्ये जागा बनवली आहे. या सामन्याचा निर्णय शूट-ऑफ फेरीत आला जेव्हा दीपिकाने परिपूर्ण 10 लावून सामना जिंकला.

जगातील क्रमांक एकची तिरंदाज दीपिका कुमारी ने माजी विश्वविजेती रशियन ऑलिम्पिक समितीची सेनिया पेरोवा हिला रोमांचक शूट आफमध्ये धूळ चारली आणि टोकियो ऑलिम्पिक महिला एकल वर्गच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

पाच सेटनंतर स्कोर 5-5ने बरोबरीत होता. मात्र, दीपिकाने दडपणाशी झुंज देत, शूट-ऑफमध्ये 10 स्कोर केला आणि रिओ ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेत्या खेळाडूला हरवले.

एका बाणाने शूट-ऑफमध्ये सुरुवात केल्यामुळे रशियन तिरंदाज दबावात आली आणि ती केवळ सात इतका स्कोर करू शकली. तर दीपिकाने सामन्या साठी दहा इतका स्कोर केला.

दीपिका कुमार तिसऱ्यांदा ऑलिम्पिक स्पर्धा खेळत आहे. ती ऑलिम्पिकच्या तिरंदाजी स्पर्धेत अंतिम आठ खेळाडूंमध्ये समाविष्ट होणारी पहिली भारतीय तिरंदाज खेळाडू बनली आहे. या आधी दीपिकाने अंतिम 16 च्या सामन्यात अमेरिकेच्या जेनिफर फर्नांडेजला 6-4ने हरवले.

मॅचची स्कोरलाइन : 2-0, 2-2, 4-2, 5-3, 5-5, 6-5

Last Updated :Jul 30, 2021, 8:58 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.