टोकियो संपलं, पॅरिस 2024 साठी नवी सुरूवात - बॉक्सर लवलिना बोर्गोहेन

author img

By

Published : Aug 9, 2021, 3:58 PM IST

Tokyo done and dusted: Lovlina Borgohain says will start afresh in every aspect for Paris 2024

आसामच्या गोलाघाट जिल्ह्यातील बरोमुखिया येथील 23 वर्षीय लवलिना बोर्गोहेन ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी भारताची तिसरी बॉक्सर ठरली. तिच्याआधी सहावेळची जगज्जेती एमसी मेरी कोम आणि विजेंदर सिंग यांनी हा कारनामा केला आहे. लवलिना या कामगिरीसह दिग्गजांच्या पंक्तित स्थान मिळवलं आहे.

मुंबई - टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताची महिला बॉक्सर लवलिना बोर्गोहेन हिला सुवर्ण पदकाने हुलकावणी दिली. तिला कास्य पदकावर समाधान मानावे लागले. यानंतर लवलिना याने, जे केलं ते मिटून गेलं आहे आणि आता आगामी पॅरिस 2024 ऑलिम्पिकसाठी नव्याने सुरूवात करणार असल्याचे सांगितलं आहे. पीटीआयशी बोलताना तिने ही माहिती दिली.

आसामच्या गोलाघाट जिल्ह्यातील बरोमुखिया येथील 23 वर्षीय लवलिना ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी भारताची तिसरी बॉक्सर ठरली. तिच्याआधी सहावेळची जगज्जेती एमसी मेरी कोम आणि विजेंदर सिंग यांनी हा कारनामा केला आहे. लवलिना या कामगिरीसह दिग्गजांच्या पंक्तित स्थान मिळवलं आहे.

लवलिना म्हणाली, माझं पहिलं त्याग हे आहे की, मी मागील आठ वर्षांपासून घरापासून लांब राहत आहे. कुटूंब अडचणीत असताना मला लांब राहून पाहायचं नव्हतं. हे माझं सर्वात मोठा त्याग आहे.

मी फास्ट फूडपासून लांब राहिले. हा माझा वैयक्तिक त्याग आहे. माझ्या वयात इतर युवा फास्टफूट खातात. मी याचा त्याग केला. मी फक्त खेळावर ध्यान केंद्रित करत होते. याशिवाय मी आठ वर्ष एकही दिवस सुट्टी घेतली नाही, असे देखील लवलिना म्हणाली.

टोकियो ऑलिम्पिकनंतर तु तुझ्या खेळात काही बदल करणार आहेस का असे विचारले असता, लवलिनला म्हणाली, हा ऑलिम्पिक संपला आहे. मी ही बाब येथेच विसरली आहे. आता मी प्रत्येक गोष्टींचा नव्याने सुरूवात करेन.

दरम्यान, लवलिनाने माजी जगज्जेती नेईन चीन चेन हिचा पराभव करत टोकियो ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरी गाठली होती. यावेळी तिने आपल्याती भया रिंगमध्ये उतरण्याआधीच संपवलं होतं. तिने हा विजय माझ्या आठवणीतील विजय असल्याचे देखील सांगितलं.

चीन चेन हिने ऑलिम्पिकआधी लवलिनाचा चार वेळा पराभव केला होता. पण तिने ऑलिम्पिकमध्ये तिला धूळ चारत पराभवाची परतफेड केली. हा माझ्या करियरमधील सर्वात विशेष क्षण असल्याचे देखील लवलिना म्हणाली.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला बॉक्सिंगपटू लवलिना बोर्गोहेन हिचे 69 वजनी गटात सुवर्ण पदकाचे स्वप्न भंगले होते. उपांत्य फेरीत लवलिनाचा तुर्कीच्या बुसेनाझ सुर्मेनेली हिने पराभव केला. या पराभवामुळे लवलिनाला कास्य पदकावर समाधान मानावे लागले.

हेही वाचा - पॅरिस ऑलिम्पिकमधून भारोत्तोलनाला वगळणार? ऑलिम्पिक समितीला मिळाले नवे अधिकार

हेही वाचा - टोकियोतून भारतीय अॅथलिट आज मायदेशी परतणार, विमानतळावर सुरक्षा वाढवली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.