ETV Bharat / sports

Indian Hockey Team : भारतीय हॉकी संघाच्या कामगिरीवर 'या' राज्याचे मुख्यमंत्री खूश, १ कोटी १० लाख रुपये देण्याची केली घोषणा

author img

By

Published : Aug 13, 2023, 12:46 PM IST

Updated : Aug 13, 2023, 2:47 PM IST

Indian Hockey Team
संग्रहित छायाचित्र

भारतीय हॉकी संघाने मलेशियाच्या संघावर 4-3 ने दणदणीत विजय मिळवला आहे. चेन्नई येथे शनिवारी हा सामना रंगला होता. या सामन्यानंतर भारतीय हॉकी संघाला तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी एक कोटी 10 लाख रुपयाचे बक्षिस देण्याची घोषणा केली.

चेन्नई : भारतीय संघाने मलेशियाच्या संघावर शनिवारी चेन्नईत झालेल्या सामन्यात दणदणीत विजय मिळवला आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी भारतीय हॉकी संघाला विजयी ट्रॉफी प्रदान केली. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर, तामिळनाडूचे क्रीडा मंत्री उदयानिधी स्टॅलिन यांची या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री एस के स्टॅलिन यांनी भारतीय हॉकी संघाला एक कोटी 10 लाख रुपये देण्याची घोषणा केली.

भारतीय संघाने तब्बल चार वेळा जिंकली ट्रॉफी : चेन्नई येथील महापौर राधाकृष्णन मैदानात एशियन हॉकी चॅम्पीयनशिप ट्रॉफीचा अंतिम सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय हॉकी संघाने जोरदार प्रदर्शन करत मलेशियाच्या संघावर 4-3 ने दणदणीत विजय मिळवला. या सामन्यानंतर देशभरात भारतीय संघाचे कौतुक होत आहे. एशियन चॅम्पीयनशिप ट्रॉफीवर भारतीय संघाने तब्बल चार वेळा नाव कोरले आहे.

मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक खेळाडूला दिले पाच लाख : एशियन चॅम्पीयनशिप ट्रॉफी भारतीय संघाने जिंकल्यानंतर देशभरात मोठा जल्लोष करण्यात आला. ही ट्रॉफी भारतीय संघाला तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी भारतीय हॉकी संघातील प्रत्येक खेळाडूला 5 लाख रुपये देण्याची घोषणा केली. तर संघाच्या प्रशिक्षकांना प्रत्येकी 2.5 लाख रुपये देण्याची येणार असल्याची घोषणाही एम के स्टॅलिन यांनी केली.

  • केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी लावली मैदानात रोपे : भारत आणि मलेशिया संघाच्या दरम्यान खेळवण्यात येणाऱ्या या सामन्यात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी दोन्ही संघाच्या सामन्यापूर्वी मैदानात अनुराग ठाकूर यांच्या हस्ते रोपे लावण्यात आली. प्रतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील भारतीय खेळाडूंना ट्विट करत शुभेच्छा दिल्या होत्या.

हेही वाचा -

  1. Asian Champions Trophy : भारताने मलेशियाला ४-३ ने चारली धूळ; विक्रमी चौथ्यांदा विजेतेपदावर कब्जा
  2. ज्यूनियर हॉकी विश्व कप स्पर्धेचे यजमानपद भूषवणार ओडिशा, CM नवीन पटनायक यांची घोषणा
  3. Indian Hockey Coach Reid : भारतीय संघ हॉकी विश्वचषकाचा प्रमुख दावेदार, संघाचे प्रशिक्षक रीड यांनी मुलाखतीत केला विश्वास व्यक्त
Last Updated :Aug 13, 2023, 2:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.