ETV Bharat / sports

'खेलरत्न'साठी शरथ कमल, द्युती चंद, नीरज चोपडा आणि शुभंकर शर्माच्या नावाची शिफारस

author img

By

Published : Jul 1, 2021, 4:49 PM IST

table tennis player sharath kamal, sprinter Dutee Chand, javelin thrower Neeraj Chopra, Golfer Shubhankar Sharma name Recommended For Khel Ratna Award
'खेलरत्न'साठी शरथ कमल, द्युती चंद, नीरज चोपडा आणि शुभंकर शर्माच्या नावाची शिफारस

खेलरत्न पुरस्कारासाठी टेबल टेनिसपटू शरथ कमल, धावपटू द्युती चंद, भालाफेकपटू नीरज चोपडा आणि गोल्फपटू शुभंकर शर्मा यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे.

मुंबई - भारतीय अॅथलेटिक महासंघाने (एएफआय) टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदकाचा दावेदार असलेला भालाफेकपटू नीरज चोपडा याची शिफारस राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी केली आहे. २३ वर्षीय चोपडा याच्या नावाच्या शिफारसीआधी ओडिशा सरकराने धावपटू द्युती चंदचे नाव या पुरस्कारासाठी पाठवले आहे. तर दुसरीकडे भारतीय गोल्फ संघाने (आयजीयू) दोन वेळचा युरोपीय टूरचा विजेता शुभंकर शर्मा याचे नाव पाठवले आहे. याशिवाय भारतीय टेबल टेनिस महासंघाने शरथ कमल याच्या नावाची खेलरत्नसाठी शिफारस केली आहे.

नीरज चोपडाची कामगिरी

नीरज चोपडा याचे नाव खेलरत्न पुरस्कारासाठी चौथ्यांदा पाठवण्यात आले आहे. नीरजने २०१८ गोल्ड कोस्ट राष्ट्रकूल स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. त्यानंतर त्याला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नीरजने टोकियो ऑलिम्पिकचे तिकिट मिळवले आहे. तो या स्पर्धेत पदकाचा दावेदार आहे.

अशी कामगिरी करणारा शुभंकर भारताचा पहिला गोल्फपटू

२४ वर्षीय शुभंकर शर्मा याने डिसेंबर २०१७ मध्ये जोबर्ग ओपनचे विजेतेपद पटकावले होते. अशी कामगिरी करणारा तो भारताचा पहिला गोल्फपटू आहे. यानंतर त्याने फेब्रुवारी २०१८ मध्ये बॅक चॅम्पियनशीपचे विजेतेपद पटकावले. तो २०१८ साली यूरोपीय टूरचा 'रुकी ऑफ द इयर' पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू आहे.

शरत कमलची कामगिरी

शरथ कमल याला २०१९ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. जागतिक क्रमवारीत ३२व्या स्थानी असणाऱ्या या खेळाडूने राष्ट्रकूल स्पर्धेत अनेकदा सुवर्णपदक जिंकले आहे. २०१८ सालच्या आशियाई स्पर्धेत कांस्य पदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा तो सदस्य होता. भारताने प्रथमच या स्पर्धेत पदक जिंकले होते. तीन वर्षापूर्वी आशियाई स्पर्धेत त्याने मनिका बत्रासोबत मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले होते.

हेही वाचा - ENG W vs IND W २nd ODI: इंग्लंडकडून भारताचा पाच विकेट्सने पराभव, मालिकाही गमावली

हेही वाचा - जिद्दीला सॅल्युट! शेतात भालाफेक शिकलेली अन्नू राणी टोकियो ऑलिम्पिकला पात्र

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.