ETV Bharat / sports

स्टेडियम आणि क्रीडा संकुलातील क्रीडा उपक्रम होणार सुरू, पण...

author img

By

Published : May 19, 2020, 12:08 PM IST

केंद्र सरकारने लॉकडाऊन 31 मेपर्यंत वाढवला आहे. भारतात सुरू झालेल्या लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात क्रीडा संकुले आणि स्टेडियम उघडण्यास गृह मंत्रालयाने परवानगी दिली आहे. क्रीडाविषयक उपक्रम स्थगित झाल्यामुळे ही मैदाने मार्चच्या मध्यापासून बंद होती. मात्र, मंत्रालयाच्या निर्णयानंतर खेळाडूंना सराव करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

sports minister kiren rijiju said sports activities will begin but no access to gym and pool
स्टेडियम आणि क्रीडा संकुलातील क्रीडा उपक्रम होणार सुरू, पण...

नवी दिल्ली - स्टेडियम आणि क्रीडा संकुलातील क्रीडा उपक्रम गृह मंत्रालय व संबंधित राज्य सरकार यांच्या नियमांनुसार सुरू केले जातील. परंतु व्यायामशाळा आणि तरण तलावांच्या वापरावर बंदी घातली जाईल, असे केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी स्पष्ट केले आहे. रिजिजू यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली.

केंद्र सरकारने लॉकडाऊन 31 मेपर्यंत वाढवला आहे. भारतात सुरू झालेल्या लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात क्रीडा संकुले आणि स्टेडियम उघडण्यास गृह मंत्रालयाने परवानगी दिली आहे. क्रीडाविषयक उपक्रम स्थगित झाल्यामुळे ही मैदाने मार्चच्या मध्यापासून बंद होती. मात्र, मंत्रालयाच्या निर्णयानंतर खेळाडूंना सराव करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ज्या खेळाडूंनी टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता दर्शवली आहे किंवा ज्यांना पात्रता आणि मोठी स्पर्धा खेळायची आहे, ते टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण सुरू करतील, असे यापूर्वी रिजिजू म्हणाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.