ETV Bharat / sports

World Chess Olympiad Torch Relay : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पेटवली जाणार 44व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडची मशाल

author img

By

Published : Jun 16, 2022, 3:38 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) 19 जून रोजी नवी दिल्ली येथे 44व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडसाठी ( World Chess Olympiad Torch Relay ) मशाल पेटवून उद्घाटन करणार आहे. ही स्पर्धा 28 जुलै ते 10 ऑगस्ट दरम्यान होणार असून हा कार्यक्रम दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवर पार पडणार आहे. यासंदर्भातील माहिती जागतिक बुद्धिबळ महासंघाने दिली आहे.

PM Modi to launch torch relay
PM Modi to launch torch relay

चेन्नई - पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) 19 जून रोजी नवी दिल्ली येथे 44व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडसाठी ( World Chess Olympiad Torch Relay ) मशाल पेटवून उद्घाटन करणार आहे. ही स्पर्धा 28 जुलै ते 10 ऑगस्ट दरम्यान होणार असून हा कार्यक्रम दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवर पार पडणार आहे. यासंदर्भातील माहिती जागतिक बुद्धिबळ महासंघाने दिली आहे.

हेही वाचा - Kapil Dev Statement : '१-२ मॅचमध्ये धावा करतो परत अपयशी होतो...', 'या' खेळाडूवर संतापले कपिल देव

या कार्यक्रमाला पाच वेळा विश्वविजेता राहिलेला विश्वनाथन आनंद ही सहभागी होण्याची शक्यता आहे. ही मशाल नेहमीच भारतात पेटवली जाते. त्यानंतर संपूर्ण खंडांचा प्रवास करत ही यजमान देशात पोहोचते. मात्र, यंदा वेळेची कमी असल्याने ही मशाल फक्त भारतातच फिरेल.

हेही वाचा - Neeraj Chopra : नीरज चोप्राने मोडला स्वत:चा राष्ट्रीय विक्रम; पावो नुर्मी गेम्समध्ये 89.30 मीटर थ्रोसह पटकावले रौप्यपदक

तसेच या स्पर्धेसाठी 187 देशांतील खुल्या आणि महिला गटातील विक्रमी 343 संघ आधीच दाखल झाले असल्याची माहिती AICF च्यावतीने देण्यात आली आहे.

हेही वाचा - India vs Ireland T-20 Series : आयर्लंडविरुद्धच्या T20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; कर्णधार पदाची धुरा हार्दिक पांड्याच्या खांद्यावर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.