MS Dhoni spotted playing golf : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पसोबत माहीने खेळला गोल्फ; फोटो व्हायरल

MS Dhoni spotted playing golf : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पसोबत माहीने खेळला गोल्फ; फोटो व्हायरल
MS Dhoni spotted playing golf : चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार धोनी नुकताच यूएस ओपन टेनिस स्पर्धेतील कार्लोस अल्काराझचा सामना पाहण्यासाठी पोहोचला होता. भारताच्या माजी कर्णधाराची लोकप्रियता केवळ भारतातच नाही तर इतर देशांमध्येही आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी धोनीला गोल्फ खेळासाठी आमंत्रित केलं होतं. त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हैदराबाद : MS Dhoni spotted playing golf : भारतीय क्रिकेट संघाच्या महान कर्णधारांपैकी एक महेंद्रसिंह धोनीचे केवळ भारतातच नाही तर जगभरात चाहते आहेत. धोनीने क्रिकेटमध्ये मोठं यश संपादन केलंय. एकदिवसीय विश्वचषक, टी-२० विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा तो एकमेव कर्णधार आहे. धोनीला फक्त क्रिकेट आवडते असं नाही. या खेळाशिवाय त्याला इतरही अनेक खेळ आवडतात. धोनीचं पहिलं प्रेम म्हणजे फुटबॉल आहे. याशिवाय टेनिस आणि गोल्फ खेळण्याची संधीही तो सोडत नाही. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार नुकताच यूएस ओपन टेनिस स्पर्धेतील कार्लोस अल्काराझचा सामना पाहण्यासाठी पोहोचला होता. आता अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतचा त्याचा एक फोटो व्हायरल होत आहे.
-
Former US President Donald Trump hosted a Golf game for MS Dhoni.
— Johns. (@CricCrazyJohns) September 8, 2023
- Thala fever in USA....!!! pic.twitter.com/8V7Vz7nHMB
धोनीनं लुटला गोल्फचा आनंद : धोनी सध्या अमेरिकेत आहे. यूएस ओपनचे सामने पाहण्याबरोबरच त्याने गोल्फचाही आनंद लुटला. यादरम्यान माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प देखील धोनीसोबत दिसले. दोघांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. भारताच्या माजी कर्णधाराला अमेरिकेच्या माजी राष्ट्रपतींनी ट्रम्प नॅशनल गोल्फ क्लब, बेडमिन्स्टर येथे गोल्फ खेळण्यासाठी आमंत्रित केले होते. धोनीचे जवळचे सहकारी आणि उद्योगपती हितेश संघवी यांनी इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आणि लिहिले, "धोनी, डोनाल्ड ट्रम्प आणि राजीव नाईक यांच्यासोबत गोल्फ. आम्हाला होस्ट केल्याबद्दल माजी राष्ट्रपतींचे आभार."
-
MS Dhoni playing golf with Donald Trump.
— Johns. (@CricCrazyJohns) September 8, 2023
- The craze for Dhoni is huge. pic.twitter.com/fyxCo3lhAQ
पुन्हा खेळताना पाहण्याची चाहत्यांमध्ये आशा : धोनी हा इतिहासातील एकमेव कर्णधार आहे ज्याने भारताला तीनही आयसीसी ट्रॉफी जिंकण्यासाठी मार्गदर्शन केले. रेल्वे स्टेशनवर तिकीट कलेक्टर म्हणून करिअरची सुरुवात करून पुढे तो भारतातील सर्वात मोठा ट्रॉफी कलेक्टर बनला. या वर्षाच्या सुरुवातीला मुंबईतील एका रुग्णालयात एमएस धोनीच्या डाव्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर हा अनोखा गोल्फिंग अनुभव त्याला मिळाला. पुढील वर्षी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या 17 व्या आवृत्तीत त्याला पुन्हा खेळताना पाहण्यासाठी या शस्त्रक्रियेमुळे चाहत्यांमध्ये आशा निर्माण झाली आहे. पाचव्या आयपीएल स्पर्धेत विजय मिळवून चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करणारा धोनी या स्पर्धेनंतर अशा परिस्थितीतून गेला आहे.
हेही वाचा :
- World Cup २०२३ : आगामी एकदिवसीय विश्वचषकसाठी आज होणार भारतीय संघाची घोषणा; कोणाला संधी?
- World Cup २०२३ : एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर, जाणून घ्या कोणाची लागली लॉटरी, कोणाचा पत्ता कट झाला
- Demand Of Team Bharat : खेळाडूंच्या जर्सीवर 'टीम इंडिया'ऐवजी 'टीम भारत' लिहिण्याची वीरेंद्र सेहवागची मागणी
