ETV Bharat / sports

Khelo India Winter Games : महाराष्ट्रातील उन्हाळ्यातून थेट काश्मीरच्या हिवाळ्यात! खेलो इंडिया हिवाळी स्पर्धेत महाराष्ट्रातील खेळाडूंचे अनुभव

author img

By

Published : Feb 15, 2023, 2:44 PM IST

खेलो इंडिया गेम्समध्ये महाराष्ट्रातील खेळाडूंनी चांगली कामगिरी करून अनेक पदके जिंकली आहेत. या खेळाच्या समारोप समारंभानंतर वार्ताहाराशी बोलताना महाराष्ट्रातील खेळाडूंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Khelo India Winter Games
खेलो इंडिया हिवाळी स्पर्धा

गुलमर्ग (जम्मू आणि काश्मीर) : काश्मीर खोऱ्यातील गुलमर्ग येथे तिसऱ्या खेलो इंडिया हिवाळी स्पर्धेचा समारोप झाला. समारोप समारंभात विविध खेळांमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंनी हिंदी गाण्यांवर नृत्य करून विजयोत्सव साजरा केला. या स्पर्धेत 29 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 1500 हून अधिक खेळाडूंनी सक्रिय सहभाग घेतला होता. स्पर्धेत आइस स्केटिंग, स्पीड स्केटिंग, फिगर स्केटिंग, आइस हॉकी, बॅंडी, कर्लिंग, आइस स्टॉक्स, स्कीइंग, स्नोबोर्डिंग, स्नो शू रेस, बॉब स्लेज इत्यादी खेळांचा समावेश होता.

वातावरणाशी जुळवून घेताना अडचणी आल्या : खेलो इंडिया हिवाळी खेळांमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंनी ईटीव्हीच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, आम्ही ज्या राज्यांतून आलो तेथे या दिवसांत उष्णता असते, परंतू काश्मीरमध्ये सध्या प्रचंड थंडी आहे. सुरुवातीला या वातावरणाशी जुळवून घेताना आम्हाला खूप अडचणी आल्या. पण जेव्हा स्पर्धा सुरु झाली तेव्हा आमच्या मनात फक्त विजयाचे लक्ष होते.

महाराष्ट्रातील उन्हाळ्यातून थेट काश्मीरच्या हिवाळ्यात! : खेलो इंडिया गेम्समध्ये महाराष्ट्रातील खेळाडूंनी चांगली कामगिरी करून अनेक पदके जिंकली आहेत. खेलो इंडियाच्या समारोप समारंभानंतर वार्ताहराशी बोलताना महाराष्ट्रातील खेळाडूंनी आपली प्रतिक्रिया दिली. दक्षा अरविंद जैन हिने तिसर्‍या खेलो इंडिया हिवाळी स्पर्धेत आइस स्टॉक खेळात रौप्य पदक जिंकण्यात यश मिळविले. ती म्हणाली की, यावर्षी आमची तयारी चांगली होती. मात्र स्पर्धेतील कामगिरी तितकी चांगली नव्हती, त्यामुळे आम्हाला सुवर्णपदक जिंकण्यात अपयश आले. पण पुढील वर्षी आम्ही नक्कीच सुवर्णपदक मिळवू. महाराष्ट्रातील उन्हाळ्यातून आम्ही थेट काश्मीरच्या हिवाळ्यात आलो, यामुळे आम्हाला खूप त्रास झाला. पण नंतर आम्ही जुळवून घेतले. खेलो इंडिया आमच्यासारख्या खेळाडूंसाठी खूप महत्त्वाची स्पर्धा आहे, कारण ती आम्हाला खेळात पुढे जायची संधी देते.

'पुढील वर्षी सुवर्णपदक जिंकू' :आणखी एक स्पर्धक दिव्या गायकवाड म्हणाली की, आम्ही आइस स्टॉक खेळात भाग घेतला आणि रौप्य पदक जिंकले. जरी आम्ही खूप मेहनत केली होती पण खेळादरम्यान थोडासा वेळ वाया गेल्यामुळे आम्हाला सुवर्णपदक जिंकण्यात अपयश आले. सायली ठाकूर म्हणाली की, आम्ही आइस स्टॉक्स खेळात रौप्य पदक जिंकले ज्यामुळे आम्हाला खूप प्रेरणा मिळाली आणि आम्ही आनंदी आहोत. पुढील वर्षी आम्ही नक्कीच सुवर्णपदक जिंकू.

हेही वाचा : Chetan Sharma Sting : मुख्य निवडकर्ता चेतन शर्माच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये विराट, बुमराहवर अनेक खळबळजनक खुलासे!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.