ETV Bharat / sports

KIYG 2021 : आदिल अल्ताफने जम्मू-काश्मीरसाठी जिंकले पहिले सायकलिंग सुवर्णपदक

author img

By

Published : Jun 12, 2022, 10:24 PM IST

शनिवारी खेलो इंडिया युथ गेम्समध्ये ( Khelo India Youth Games 2021 ) सकाळी एका शिंप्याच्या मुलाने मुलांच्या 70 किमी सायकल स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले आहे. त्याने आदल्या दिवशी 28 किमी शर्यतीत त्याने रौप्य पदक जिंकले होते.

Adil Altaf
Adil Altaf

पंचकुला: आदिल अल्ताफने खेलो इंडिया युथ गेम्समध्ये ( Khelo India Youth Games ) जम्मू-काश्मीरसाठी पहिले सायकलिंग सुवर्णपदक जिंकून ( Adil Altaf wins cycling gold ) इतिहास रचला. शनिवारी सकाळी श्रीनगरमध्ये एका शिंप्याच्या मुलाने मुलांची 70 किमी रोड रेस जिंकली. जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी त्याचे अभिनंदन आदल्या दिवशी 28 किमी शर्यतीत रौप्य पदक जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन केले होते.

अल्ताफसाठी शनिवारी हा एक महत्त्वपूर्ण विजय होता. कारण त्याला सिद्धेश पाटील (महाराष्ट्र) आणि दिल्लीच्या अर्शद फरीदी यांच्यासह अधिक उत्साही सायकलपटूंनी उभे केलेले आव्हान पार करावे लागले. विजयानंतर तो म्हणाला, हा माझ्यासाठी मोठा क्षण आहे. चांगली कामगिरी करण्याच्या आत्मविश्वासाने मी येथे आलो आहे.

लहानपणी अल्ताफ मध्य काश्मीरच्या श्रीनगर जिल्ह्यातील लाल बाजारच्या गल्लीबोळातून सायकल चालवत असे. त्याला आपल्या या खेळाची आवड होती, त्यामुळे तो सायकल चालवायचा आणि त्याच्या शिंपी वडिलांसाठी सामान पोहोचवायचा. जेव्हा तो 15 वर्षांचा झाला तेव्हा त्याने प्रथमच त्याच्या शाळेत, हार्वर्ड, काश्मीर येथे झालेल्या सायकलिंग स्पर्धेत भाग घेतला. तिथे त्याने या खेळाला गांभीर्याने घेतले.

त्याच्या गरीब वडिलांनी त्याची आवड जोपासण्यासाठी त्याला सायकल विकत घेण्यासाठी दुप्पट मेहनत केली. त्याने स्थानिक स्पर्धा जिंकण्यास सुरुवात केल्यामुळे, श्रीनगरमधील स्टेट बँक ऑफ इंडिया त्याच्या मदतीसाठी पुढे आली आणि त्याची MTB बाईक प्रायोजित केली, ज्याची किंमत 4.5 लाख रुपये होती. 18 वर्षीय अल्ताफ गेल्या सहा महिन्यांपासून एनआयएस पटियाला येथे खेलो इंडिया गेम्ससाठी तयारी करत होता.

हेही वाचा - Ipl Media Rights E Auction : प्रति सामन्याचा आकडा पोहचला 100 कोटी रुपयाच्या पार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.