ETV Bharat / sports

माना पटेलने रचला इतिहास, टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी पहिली भारतीय महिला जलतरणपटू

author img

By

Published : Jul 3, 2021, 2:56 PM IST

भारतीय जलतरण महासंघाने (एएफआय) सांगितलं की, महिला जलतरणपटू माना पटेल हिला टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट मिळाले आहे. गुजरातची २१ वर्षीय माना १०० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारामध्ये भाग घेणार आहे.

indian swimmer maana patel becomes-3rd-indian-and-1st-female-to-qualify-for-tokyo-olympics
माना पटेलने रचला इतिहास, टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी पहिली भारतीय महिला जलतरणपटू

मुंबई - भारताची महिला जलतरणपटू माना पटेल हिला टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट मिळाले आहे. भारतीय जलतरण महासंघाने (एएफआय) याची माहिती दिली. गुजरातची २१ वर्षीय माना १०० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारामध्ये भाग घेणार आहे. या खेळासाठी पात्र ठरणारी माना तिसरी भारतीय तर पहिली महिला जलतरणपटू ठरली आहे. यापूर्वी जलतरणपटू साजन प्रकाश आणि श्रीहरी नटराज हे ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत.

भारतीय जलतरण महासंघाने दिलेल्या माहितीनुसार, विद्यापीठ कोट्यातून माना पटेल हिची ऑलिम्पिकसाठी निवड झाली आहे. विद्यापीठ कोट्यातून एका देशाच्या एका पुरुष आणि महिलेला ऑलिम्पिकमध्ये भाग घेता येतो. यात मानाची निवड झाली. माना टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये १ मिनिट २ सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळ नोंदविण्याचे लक्ष्य असल्याचे मानाने सांगितलं आहे.

टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्यानंतर माना पटेलने आनंद व्यक्त केला. ती म्हणाली, 'कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाउनमुळे मला दुखापतीतून बरे होण्यास मदत झाली. त्यानंतर निराशाही आली होती. खूप दिवस पाण्यापासून दूर राहण्याची मला सवय नाही. पण आता ऑलिम्पिकमध्ये भाग घेता येणार असल्याने मी उत्सुक आहे.'

दरम्यान, माना पटेल हिला २०१९ मध्ये घोट्याला दुखापत झाली होती. यामुळे माना अनेक स्पर्धांना मुकली होती. या वर्षाच्या सुरवातीला तिने कमबॅक केले आहे. तिने एप्रिलमध्ये उझबेकिस्तानमध्ये पार पडलेल्या जलतरण स्पर्धेत भाग घेतला होता. यात तिने १०० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात एक मिनिट ४.४७ सेकंदाची वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले होते.

उझबेकिस्तानच्या स्पर्धेनंतर ती सर्बिया आणि इटलीतील जलतरण स्पर्धेत देखील सहभागी झाली होती. तसेच तिने बेलग्रेडमध्ये पार पडलेल्या १०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये राष्ट्रीय विक्रम केला होता. एक मिनिट आणि तीन सेकंदामध्ये तिने ही शर्यत पूर्ण केली होती. मानाची निवड टोकियो ऑलिम्पिकसाठी झाल्यानंतर केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनीही मानाचे अभिनंदन केले आहे.

  • Backstroke swimmer Maana Patel has become the 1st female and 3rd Indian swimmer to qualify for #Tokyo2020. I congratulate Maana, who qualified through Universality Quota. Well done!! pic.twitter.com/LBHup0F7RK

    — Kiren Rijiju (@KirenRijiju) July 2, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - WI vs SA ३rd T२०: अखेरच्या चेंडूवर षटकार आणि श्वास रोखून धरायला लावणारे ६ चेंडू

हेही वाचा - Wimbledon open : मेदवेदेव तिसऱ्या फेरीत, एलिना स्वितोलिनाचे आव्हान संपुष्टात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.