ETV Bharat / sports

अदिती अशोक महिला ओपन गोल्फच्या कट ऑफ फेरीत

author img

By

Published : Aug 21, 2021, 4:13 PM IST

Indian golfers Aditi Ashok enters women's open golf cut
अदिती अशोक महिला ओपन गोल्फच्या कट ऑफ फेरीत

भारतीय महिला गोल्फर अदिती अशोक हिने एआयजी महिला ओपन स्पर्धेच्या कट ऑफ फेरीत प्रवेश केला आहे.

कार्नोस्टी (स्कॉटलंड) - भारतीय महिला गोल्फर अदिती अशोक हिने एआयजी महिला ओपन स्पर्धेच्या कट ऑफ फेरीत प्रवेश केला आहे. ती 2018 नंतर प्रथमच करियरमधील सर्वश्रेष्ठ प्रदर्शनासह संयुक्तपणे 22 व्या स्थानावर राहिली.

आदिती अशोकने एआयजी महिला ओपन स्पर्धेत सहा होलवर बर्डी लगावले आणि पुढील होलवर बोगी केलं. मीना हारिजे आणि इंग्लंडची जॉर्जिया 69 राउंडमध्ये अव्वलस्थानी राहिल्या.

बर्डी हा काय आहे प्रकार...

प्रत्येक होलसाठी गोल्फरला स्ट्रोक घेण्यासाठी एक संख्या निर्धारित केली जाते. ती तीन, चार किंवा पाच असू शकते. खेळाडूंना त्या स्ट्रोक्स संख्येमध्ये चेंडूला होलमध्ये न्यावं लागतं. जर यात खेळाडूने एक स्ट्रोक कमी घेत असे केलं तर त्याला बर्डी म्हटलं जातं. तर दोन स्ट्रोक कमी घेत असे केलं तर त्याला ईगल असे म्हणतात.

हेही वाचा - World Athletics Championships: अमित खत्रीची रौप्य पदकाला गवसणी

हेही वाचा - नीरज चोप्राचे नाव पुण्यातील स्टेडियमला देण्यात येणार, राजनाथ सिंह घोषणा करण्याची शक्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.