ETV Bharat / sports

भारताने दुसरा सामना गमावला, नेदरलँड्सने पटकावले एफआयएच प्रो लीग पुरुष विजेतेपद

author img

By

Published : Jun 20, 2022, 2:01 PM IST

जेतेपदाच्या माफक आशा कायम ठेवण्यासाठी भारताला नेदरलँड्सविरुद्ध विजयाची नोंद करणे आवश्यक होते पण तसे झाले नाही. नेदरलँड्सने 14 सामन्यांतून 35 गुणांसह पुरुषांचे विजेतेपद पटकावले तर दोन सामने खेळायचे बाकी आहेत.

नेदरलँड्सने पटकावले एफआयएच प्रो लीग पुरुष विजेतेपद
नेदरलँड्सने पटकावले एफआयएच प्रो लीग पुरुष विजेतेपद

रॉटरडॅम : भारतीय पुरुष हॉकी संघाच्या एफआयएच प्रो लीगचे विजेतेपद पटकावण्याच्या आशा रविवारी मावळल्या. दुसऱ्या सामन्यात नेदरलँड्सकडून 1-2 असा भारताचा पराभव झाला. शनिवारी सलामीच्या लढतीत भारताला नेदरलँड्सकडून 1-4 ने पराभव पत्करावा लागला होता. कारण दोन्ही संघ नियमित वेळेच्या 60 मिनिटांनंतर 1-4 असे बरोबरीत होते.

जेतेपदाच्या माफक आशा कायम ठेवण्यासाठी भारताला नेदरलँड्सविरुद्ध विजयाची नोंद करणे आवश्यक होते पण तसे झाले नाही. नेदरलँड्सने 14 सामन्यांत 35 गुणांसह पुरूषांचे विजेतेपद पटकावले तर दोन सामने अजून खेळायचे आहेत.


ऑलिम्पिक चॅम्पियन बेल्जियम 16 ​​सामन्यांत 35 गुणांसह दुसऱ्या तर भारत 16 सामन्यांत 30 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. अभिषेकच्या गोलमुळे भारताने सामन्याची शानदार सुरुवात केली आणि 30 सेकंदात आघाडी घेतली. अभिषेकने उजव्या एंडकडून चेंडूचा ताबा घेतला आणि चार बचावपटूंना हूल दिल्यानंतर डच संघाचा दुसऱ्या पसंतीचा गोलरक्षक मॉरिट्झ विसेरला चकवा देऊन त्याने गोल केला. नेदरलँड्सने मात्र सातव्या मिनिटाला झिप जेन्सेनच्या पेनल्टी कॉर्नरवर बरोबरी साधली.

जागतिक क्रमवारीत तिसर्‍या क्रमांकाचा संघ नेदरलँड आणि चौथ्या क्रमांकाचा संघ भारत यांच्यात चुरशीची स्पर्धा होती. 11व्या मिनिटाला नेदरलँड्सला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला जो गोलरक्षक पीआर श्रीजेशने परतवून लवला.

नेदरलँडला आणखी तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले पण ते भारतीय बचावफळी भेदण्यात अपयशी ठरले. हरमनप्रीत सिंग 16व्या मिनिटाला भारतासाठी पेनल्टी कॉर्नरवर गोल करू शकला नाही. मध्यंतराच्या दोन मिनिटे आधी भारताला सलग दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले पण संघाला त्यांचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. तिसऱ्या क्वार्टरमध्ये 45व्या मिनिटाला जोरीट क्रूनने नेदरलँड्सला 2-1 ने आघाडीवर नेले. यानंतर भारताला गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या पण त्याचा काही उपयोग करुन घेता आल नाही.

IND vs SA 5th T20 : रिषभ पंतने सलग पाचव्यांदा गमावली नाणेफेक; दक्षिण आफ्रिकेने घेतला गोलंदाजीचा निर्णय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.