ETV Bharat / sports

World Test Championship 2023 : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल 2023 ची तारीख जाहीर; पाहा यावरील सविस्तर रिपोर्ट

author img

By

Published : Feb 8, 2023, 6:54 PM IST

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल 2023 ची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 7 ते 11 जून दरम्यान ओव्हल मैदानावर अंतिम सामना खेळवला जाणार आहे. तर आयसीसीने १२ जून हा दिवस राखीव ठेवला आहे. गेल्या फायनलमध्ये पावसाने अनेक अडचणी वाढवल्या होत्या.

World Test Championship 2023
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल 2023 ची तारीख जाहीर

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल 2023 ची तारीख जाहीर केली. या वर्षी, WTC 2023 चा अंतिम सामना ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 7 ते 11 जूनदरम्यान लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. याशिवाय 12 जूनचा दिवस अंतिम सामन्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पहिल्या सत्राचा अंतिम सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात साउथम्प्टन (इंग्लंड) येथे खेळला गेला. ज्यामध्ये न्यूझीलंडने भारताचा 8 गडी राखून पराभव केला.

भारताला चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळायचा असेल तर : यावेळी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होऊ शकतो. सध्याच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया ७५.५६ टक्के गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. तर, भारत ५८.९३ टक्क्यांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचवेळी आता ९ फेब्रुवारीपासून सुरू होणारी बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धा दोन्ही संघांसाठी महत्त्वाची बनली आहे. भारताला चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळायचा असेल, तर मालिका 3-1 अशी जिंकणे आवश्यक आहे. अन्यथा भारताला अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी इतर संघांच्या विजय-पराजयावर अवलंबून राहावे लागेल.

दोन कसोटी सामन्यांची मालिका : श्रीलंका 53.33 टक्क्यांसह तिसऱ्या आणि दक्षिण आफ्रिका 48.72 टक्क्यांसह चौथ्या स्थानावर कायम आहे. त्याच वेळी, दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज विरुद्ध 2 कसोटी सामन्यांची मालिका 28 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. तर, ९ मार्चपासून न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (पहिली कसोटी) - नागपूर, ९-१३ फेब्रुवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (दुसरी कसोटी) - दिल्ली, १७-२१ फेब्रुवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (तीसरी कसोटी) - धर्मशाला, १-५ मार्च भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (चौथी कसोटी) - अहमदाबाद, 9-13 मार्च दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी मालिका दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज (पहिली कसोटी) - सेंच्युरियन, दक्षिण आफ्रिका, 28 फेब्रुवारी-4 मार्च दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज (दुसरी कसोटी) - जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका, ८-१२ मार्च न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिका न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका (पहिली कसोटी) - क्राइस्टचर्च, न्यूझीलंड, मार्च ९-१३ न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका (दुसरी कसोटी) - वेलिंग्टन, न्यूझीलंड, १७ मार्च -21

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.