ETV Bharat / sports

ICC Women's World Cup 2023 : डकवर्थ लुईस पद्धतीने आयर्लंडचा ५ धावांनी पराभव करत भारत टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत दाखल

author img

By

Published : Feb 20, 2023, 9:01 PM IST

Updated : Feb 20, 2023, 11:11 PM IST

ICC Women's World Cup 2023
स्मृती मंधानाची दमदार खेळीने भारताच्या 20 षटकांत 6 विकेटवर 155 धावा

महिला T20 विश्वचषक स्पर्धेत भारताने डकवर्थ लुईस पद्धतीने आयर्लंडचा 5 धावांनी पराभव केला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 155 धावा केल्या. प्रत्युत्तरात, आयर्लंडच्या फलंदाजीदरम्यान 8.2 षटकांत पाऊस पडला. यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला सामना विजेता घोषित करण्यात आले.

सेंट जाॅर्ज पार्क/दक्षिण अफ्रिका : भारताने प्रथम फलंदाजी स्वीकारून डावाला सुरुवात केली. टीम इंडियाकडून शेफाली वर्मा आणि स्मृती मंधानाने भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली. परंतु, संघाच्या 62 धावसंख्येवर शेफाली डेलानीच्या चेंडूवर झेलबाद झाली. भारताला हा पहिला धक्का होता.

स्मृती मंधानाची दमदार फलंदाजी : सलामीला आलेल्या स्मृती मंधानाने जबरदस्त खेळी करीत अवघ्या 56 चेंडूत 87 धावा केल्या. तिच्या तडाखेबंद खेळी आयर्लंडचा संघ हैराण झाला आहे. तिने मैदानावर चौफेर टोलेबाजी करीत 9 चौकार आणि 3 षटकार ठोकत तिने 87 धावांची दमदार खेळी केली.

भारतीय संघाची फलंदाजी : टीम इंडियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना, 19 षटकांत 143 धावा केल्या. भारताकडून शेफाली वर्माने 29 चेंडूत 24 धावा, स्मृती मानधनाने 56 चेंडूत 87 धावांची मोठी खेळी करीत संघाच्या धावसंख्येला आकार दिला. त्यानंतर आलेल्या हरमनप्रीत कौरने 20 चेंडूत 13 धावा केल्या. रिचा घोष आज खाते उघडू शकली नाही, ती शून्यावर तंबूत परतली. दीप्ती शर्मासुद्धा भोपळ्यावर पॅव्हेलिनमध्ये परतली.

आयर्लंडची गोलंदाजी : आयर्लंड संघाला क्षेत्ररक्षणासाठी पाचारण केल्यानंतर आयर्लंडच्या संघाने भारतीय संघाला रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. भारताकडून स्मृती मंधानामुळे आयर्लंडची रणनीती कमजोर पडत होती. स्मृती मंधाना व्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजाने चांगली कामगिरी केली नाही. आयर्लंडकडून लुरा डेलनीने भेदक गोलंदाजी करीत 3 विकेट घेतल्या. तर ओर्ला प्रेंडरगास्टने स्मृती मंधानाला तंबूत पाठवून महत्त्वाची विकेट घेतली. तिने एकूण 2 विकेट घेतल्या. तर एरिएन केलीने 1 विकेट घेतली

हेही वाचा : KL Rahul Removed From Vice Captaincy : केएल राहुलला टीम इंडियाच्या उपकर्णधारपदावरून हटवले; श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, अश्विन प्रबळ दावेदार

Last Updated :Feb 20, 2023, 11:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.