ETV Bharat / sports

India vs Australia First Test : रविचंद्रन अश्विनने कांगारूंचा निम्मा संघ पाठवला तंबूत; पाहा कसोटी सामन्यातील महत्त्वाचे क्षण

author img

By

Published : Feb 11, 2023, 7:47 PM IST

First India vs Australia Test Brief; Highlights of Match and Details of Star Playerst
पहिल्या कसोटी सामन्याचे संक्षिप्त विवरण

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने कांगारूंचा एक डाव आणि 132 धावांनी पराभव केला. या सामन्यात काही नवीन विक्रम खेळाडूंच्या नावावर झाले. अनेक गोष्टींची चर्चा समाजमाध्यमांवर गाजली. चला तर पाहूया या सामन्यातील उल्लेखनीय क्षण आणि सामन्यातील महत्त्वाचे खेळाडूंच्या कामगिरीवर एक नजर

नागपूर : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नागपुरात खेळवण्यात आलेला पहिला कसोटी सामना तिसऱ्या दिवशी चहापानाच्या वेळेपूर्वी संपला. या सामन्यात ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाची फलंदाजी पूर्णपणे फ्लॉप दिसून आली. पहिल्या डावात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज दुसऱ्या डावात खेळला नाही. दुसऱ्या डावात सर्वाधिक २५ धावा केल्यानंतर केवळ स्टीव्ह स्मिथ नाबाद राहिला.

सात फलंदाजांचा दुहेरी आकडा पार नाही : ऑस्ट्रेलियन संघाचे सात फलंदाज दुसऱ्या डावात दुहेरी आकडा पार करू शकले नाहीत. दुसऱ्या डावात भारतीय फिरकी गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. रविचंद्रन अश्विनने ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात सर्वाधिक ५ बळी घेतले. त्याचवेळी मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या, तर अक्षर पटेलला एकाच विकेटवर समाधान मानावे लागले.

रवींद्र जडेजालासुद्धा दंड ठोठावला : या सामन्याच्या शेवटी रवींद्र जडेजालाही सामना शुल्काच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला. चला तर मग बघूया या मॅचच्या 5 खास गोष्टी, ज्यामुळे सामना अवघ्या 3 दिवसात संपला आणि भारतीय संघाने चार सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

1. रवींद्र जडेजाची अष्टपैलू कामगिरी : पहिल्या कसोटी सामन्यात, अष्टपैलू रवींद्र जडेजाने बॉल आणि बॅटने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सामनावीराचा पुरस्कार जिंकला. रवींद्र जडेजाने पहिल्या डावात 45 धावांत ऑस्ट्रेलियाच्या पाच खेळाडूंना बाद केले. फलंदाजी करताना त्याने शानदार 70 धावाही केल्या. दुसऱ्या डावात रवींद्र जडेजाने ऑस्ट्रेलियाच्या दोन खेळाडूंना बाद केले. रवींद्र जडेजाने दुसऱ्या डावात 12 षटकांत 34 धावांत दोन बळी घेतले. अशाप्रकारे त्याने संपूर्ण सामन्यात 7 खेळाडूंना बाद करण्यासोबतच शानदार खेळी केली. त्यामुळेच त्याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. यादरम्यान त्याने ५० हून अधिक धावा आणि ५ विकेट्स घेण्याच्या बाबतीत कपिल देव यांच्याही पुढे गेला.

2. दुसऱ्या डावात रविचंद्रन अश्विनची जादू दाखवली : पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 3 बळी घेणाऱ्या रविचंद्रन अश्विनची फिरकी गोलंदाजी दुसऱ्या डावात प्रभावी ठरली. रविचंद्रन अश्विनने ऑस्ट्रेलियन सलामीवीर उस्मान ख्वाजा याला डावाच्या दुसऱ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर कोहलीच्या हातून झेलबाद करून एकूण पाच बळी घेतले आणि त्याच्या फिरकीच्या जोरावर 5 पैकी 4 ऑस्ट्रेलियन खेळाडूंना एलबीडब्ल्यू केले. अशाप्रकारे रविचंद्रन अश्विनने 12 षटकांत 35 धावांत पाच खेळाडू बाद केले. रविचंद्रन अश्विननेही पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या 3 खेळाडूंना बाद केले होते. अशाप्रकारे अश्विनने संपूर्ण सामन्यात 8 विकेट घेतल्या. तसेच पहिल्या डावात 23 धावा केल्या.

3. कर्णधार रोहित शर्माचे शानदार शतक : पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचे शानदार शतकही मोठे निर्णायक ठरले. यादरम्यान त्याने 212 चेंडूंचा सामना करीत 15 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 120 धावा केल्या. रोहित शर्माने पहिल्या विकेटसाठी केएल राहुलसोबत ७६ धावांची, दुसऱ्या विकेटसाठी अश्विनसोबत ४२ धावांची भागीदारी तसेच अजय जडेजासोबत सामन्यादरम्यान ६१ धावांची शानदार भागीदारी केली. या 3 मोठ्या भागीदारीमुळे भारतीय संघाला ऑस्ट्रेलियावर धार मिळाली. तसेच, रोहित शर्मा तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला.

4. रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांची फलंदाजी : या सामन्यात रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांनी गोलंदाजीसोबतच फलंदाजीही चांगली केली. रवींद्र जडेजाने पहिल्या डावात 5 तसेच दुसऱ्या डावात 2 विकेट्स घेतल्या आणि सामन्यात एकूण 7 बळी घेत 70 धावांचे योगदान दिले. त्याच अक्षर पटेलनेही रवींद्र जडेजासोबत 88 धावांची शानदार भागीदारी केल्यानंतर मोहम्मद शमीसोबत 52 धावांची भागीदारी केली. या दोन मोठ्या भागीदारीमुळे टीम इंडियाला पाहुण्या संघावर 200 हून अधिक धावांची आघाडी मिळाली.

अक्षर पटेलची शानदार खेळी : अक्षर पटेल 84 धावा करून शेवटचा फलंदाज म्हणून बाद झाला असला तरी त्याचे शतक हुकले. पण फलंदाजी करताना त्याने हे सिद्ध केले की तो रवींद्र जडेजा आणि आर अश्विन यांच्यानंतर भारताचा आणखी एक उदयोन्मुख अष्टपैलू खेळाडू आहे, जो वेळ आल्यावर खालच्या क्रमाने चांगली फलंदाजी करू शकतो.

5. टॉड मर्फीची फिरकी गोलंदाजी : पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाज टॉड मर्फीने आपली छाप सोडली. पहिल्या डावात 45 षटकांत 120 धावांत 7 बळी घेण्यात त्यांना यश आले. यादरम्यान त्याने भारतीय संघातील सर्व आघाडीच्या फलंदाजांना आपला बळी बनवले. मर्फीने केएल राहुल, रविचंद्रन अश्विन, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, रवींद्र जडेजा, श्रीकर भरत आणि मोहम्मद शमी यांना आपले बळी बनवले. नवोदित खेळाडू म्हणून टॉड मर्फीने भारतीय फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. गोलंदाजीदरम्यान त्याने 100 हून अधिक धावा लुटल्या असल्या, तरी पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात 7 विकेट्स घेत त्याने निश्चितपणे दाखवून दिले की येत्या सामन्यांमध्येही तो भारतीय खेळाडूंसाठी डोकेदुखी ठरू शकतो.

हेही वाचा : Ind vs Aus First Test : भेदक गोलंदाजीने भारतीयांनी कांगारुंना लोळवले; टीम इंडियाचा एक डाव 132 धावांनी शानदार विजय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.