ETV Bharat / sports

आदिती अशोक ठरली Tokyo Olympics साठी पात्र ठरणारी पहिली भारतीय महिला गोल्फपटू

author img

By

Published : Jun 29, 2021, 10:10 PM IST

aditi-ashok-qualified-for-the-olympics-for-the-second-consecutive-time
आदिती अशोक ठरली Tokyo Olympics साठी पात्र ठरणारी पहिली भारतीय महिला गोल्फपटू

भारताची अग्रणी महिला गोल्फपटू आदिती अशोक ही सलग दुसऱ्या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली. आदितीच्या आधी अनिर्बान लाहिडी आणि उदयन माने या भारतीय गोल्फपटूंनी टोकियो ऑलिम्पिकचे तिकिट मिळवले आहे. पण आदिती टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी भारताची पहिली महिला गोल्फपटू ठरली.

मुंबई - भारताची अग्रणी महिला गोल्फपटू आदिती अशोक ही सलग दुसऱ्या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली. टोकियो ऑलिम्पिकच्या पात्रता यादीत आदिती अशोकने ४५ वा क्रमांक पटकावला. आदितीच्या आधी अनिर्बान लाहिडी आणि उदयन माने या भारतीय गोल्फपटूंनी टोकियो ऑलिम्पिकचे तिकिट मिळवले आहे. पण आदिती टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी भारताची पहिली महिला गोल्फपटू ठरली.

आदिती अशोक हिने ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्यानंतर ट्विट करत भावना व्यक्त केल्या आहेत. 'मला वाटत की, रिओ ऑलिम्पिक नुकतेच संपलेलं आहे. भारतासाठी खेळणे हे माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. मला ही संधी आणखी एकदा मिळाली आहे.'

दरम्यान, उदयन माने याने अर्जेंटिनामध्ये आयोजित एमिलियानो ग्रिलो स्पर्धेतून माघार घेतली होती. परंतु, त्याला नशिबाची साथ लाभली आणि तो सहा जुलै रोजी टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्याचे घोषित करण्यात आले.

आदिती अशोकचे नाव पात्रतेच्या पहिल्या यादीत आले आहे. तर भारताची दुसरी गोल्फपटू दीक्षा डागरचे नाव दुसऱ्या यादीत येऊ शकते. कारण काही खेळाडूंनी ऑलिम्पिकमधून माघार घेतली आहे. यामुळे तिला पाचवी राखीव खेळाडू म्हणून संधी मिळू शकते.

टोकियो ऑलिम्पिकचा कोटा मिळवण्याच्या प्रक्रियेला जुलै २०१८ पासून सुरुवात झाली होती. आदिती अशोक हिने सुरुवातीपासूनच सातत्यपूर्ण कामगिरी केली होती. तीन वर्षांपूर्वी ती ऑलिम्पिक क्रमवारीत २८ व्या स्थानावर होती. मंगळवारी आंतरराष्ट्रीय गोल्फ फेडरेशनने ६० खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. त्यात आदिती ४५ व्या स्थानावर आहे. त्यामुळे ती ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली.

दरम्यान, टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. ही स्पर्धा २३ जुलै ते ८ ऑगस्ट यादरम्यान पार पडणार आहे.

हेही वाचा - मिताली राजची ICC Women ODI Rankings मध्ये झेप; स्मृती मंधानाची घसरण

हेही वाचा - Eng vs Ind : भारतीय खेळाडूंची इंग्लंडमध्ये कुटुंबियासह भटकंती, पाहा फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.