ETV Bharat / sports

जम्मू-काश्मीरमध्ये १०००हून अधिक हॉकी खेळाडूंचा सराव

author img

By

Published : Nov 4, 2020, 4:08 PM IST

जम्मू-काश्मीरमध्ये येत्या काळात घरगुती हंगाम सुरू होणार आहे आणि त्याअंतर्गत प्रीमियर लीग खेळली जाईल. यात जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरीय सामने खेळले जाणार आहेत.

Over 1000 hockey players started practice in jammu and kashmir
जम्मू-काश्मीरमध्ये १०००हून अधिक हॉकी खेळाडूंचा सराव

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये मंगळवारपासून १०००हून अधिक हॉकी खेळाडूंनी सराव सुरू केला आहे. हे खेळाडू गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून सराव करत आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये येत्या काळात घरगुती हंगाम सुरू होणार आहे आणि त्याअंतर्गत प्रीमियर लीग खेळली जाईल. यात जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरीय सामने खेळले जाणार आहेत. हॉकी जम्मू-काश्मीरचे सरचिटणीस तरण सिंह म्हणाले की, हा एक महत्त्वाचा क्षण आहे. मला आनंद आहे की आता खेळाडू व प्रशिक्षक खेळात परतले आहेत.

सिंह म्हणाले, "आम्ही राज्यात क्रीडा उपक्रमांना वेग देण्याचे काम करत आहोत. गेल्या काही महिन्यांत आम्ही राज्यातील मूलभूत सुविधा बळकट करण्यासाठी काम केले आहे, ज्याचा थेट खेळाडूंना फायदा होईल."

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.