ETV Bharat / sports

टोकियो ऑलिम्पिकसाठी भारतीय हॉकी संघ करणार 'हे' काम

author img

By

Published : Sep 4, 2019, 11:57 PM IST

ऑलिम्पिकमधील सर्वोत्तम संघाचा एफआईएच प्रो लीगमध्ये सहभाग असतो. यामुळे भारतीय हॉकी संघ या संघाविरोधात खेळला तर संघाची तयारी लक्षात येईल. यासाठी भारतीय संघ लीगमध्ये सहभागी होणार आहे.

टोकियो ऑलिम्पिकसाठी भारतीय हॉकी संघ करणार 'हे' काम

नवी दिल्ली - आगामी २०२० मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय हॉकीचा संघ पात्र ठरलेला नाही. स्पर्धेसाठी भारतीय संघाला पात्रता फेरी खेळावी लागणार आहे. संघाचा सराव उत्तम व्हावा, यासाठी हॉकी संघाने 'एफआईएच प्रो लीग' खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑलिम्पिकमधील सर्वोत्तम संघाचा एफआईएच प्रो लीगमध्ये सहभाग असतो. यामुळे भारतीय संघ या संघाविरोधात खेळला तर संघाची तयारी लक्षात येईल.

महिला हॉकी : पुरुषांपाठोपाठ महिलांनी जिंकली ऑलिम्पिक टेस्ट इवेंट स्पर्धा

याविषयी बोलताना भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांनी सांगितले की, आगामी वर्षात प्रो-लीग स्पर्धेत खेळण्यासाठी आम्ही उत्सुक असून सर्वोत्तम संघांविरोधात खेळणे हे भारतीय खेळाडूंसाठी गरजेचे आहे. या स्पर्धेतून आगामी ऑलिम्पिकसाठी खेळाडू किती तयार आहेत हे लक्षात येईल, याची चाचपणी आपल्याला करता येईल'.

राष्ट्रीय क्रीडा दिन : मेजर ध्यानचंद यांची ११५वी जयंती

भारताचा कर्णधार मनप्रीत सिंहने या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. या लीगला १८ जानेवारी २०२० पासून भारताच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. तर भारताचा पहिला सामना नेदरलँडविरुद्ध होणार आहे.

दरम्यान, भारतीय संघाने पहिल्या वर्षी या स्पर्धेतून माघार घेतली होती. मात्र, आता सराव आणि तयारीच्या दृष्टीने भारतीय संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी खेळणाऱ्या सर्वोत्तम संघांना या महत्त्वाच्या स्पर्धेत सहभाग मिळतो.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.