ETV Bharat / sports

“हॉकीच्या विकासात माध्यमांची मोठी भूमिका”

author img

By

Published : May 17, 2020, 7:56 AM IST

हॉकी इंडियाने शनिवारी गुगलच्या माध्यमातून पत्रकारांसाठी हॉकी इंडिया कोचिंग एज्युकेशन सत्र आयोजित केले होते. चार तास चाललेल्या या सत्रात मूलभूत कौशल्ये प्रशिक्षण, तळागाळातील प्रशिक्षकाची भूमिका, चांगल्या प्रशिक्षकाची आवश्यकता, मूलभूत हॉकी कौशल्ये आणि प्रगत कौशल्ये तसेच आधुनिक हॉकी अशा विविध विषयांवर चर्चा झाली.

Hockey india president commented on development of hockey
“हॉकीच्या विकासात माध्यमांची मोठी भूमिका”

नवी दिल्ली - हॉकीच्या विकासासाठी बर्‍याच वर्षांपासून माध्यमांनी मोठी भूमिका निभावली आहे. या सत्रामुळे पत्रकारांना अनुभव घेता आला, असे हॉकी इंडियाचे अध्यक्ष मोहम्मद मुश्ताक यांनी म्हटले आहे. हॉकी इंडियाने शनिवारी गुगलच्या माध्यमातून पत्रकारांसाठी हॉकी इंडिया कोचिंग एज्युकेशन सत्र आयोजित केले होते. या कार्यक्रमामध्ये एकूण ११ पत्रकार सहभागी झाले होते.

चार तास चाललेल्या या सत्रात मूलभूत कौशल्ये प्रशिक्षण, तळागाळातील प्रशिक्षकाची भूमिका, चांगल्या प्रशिक्षकाची आवश्यकता, मूलभूत हॉकी कौशल्ये आणि प्रगत कौशल्ये तसेच आधुनिक हॉकी अशा विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी हॉकी इंडियाच्या कामगिरीचे संचालक डेव्हिड जॉन देखील उपस्थित होते.

ते म्हणाले, “भारतीय हॉकी संघांशी जवळून काम करत असताना, जगभरात हॉकी कशी खेळली जाते याबद्दल आम्ही एक निश्चित दृष्टीकोन विकसित केला आहे.”

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.