ETV Bharat / sports

'फिफा' क्रमवारीत भारताचे स्थान घसरले

author img

By

Published : Sep 18, 2020, 12:25 PM IST

India slips one place in fifa latest world rankings
फिफा क्रमवारीत भारताचे स्थान घसरले

फिफा जागतिक क्रमवारीत बेल्जियम पहिल्या स्थानावर आहे. तर, फ्रान्स आणि ब्राझील अनुक्रमे दुसर्‍या आणि तिसर्‍या स्थानावर आहेत. भारताला १०९वे स्थान मिळाले आहे.

ज्यूरिख - फिफा जागतिक क्रमवारीत भारतीय पुरुष फुटबॉल संघाची एका स्थानाने घसरण झाली आहे. गुरुवारी जाहीर झालेल्या या क्रमवारीत भारताला १०९वे स्थान मिळाले आहे. जुलै महिन्यात झालेल्या अखेरच्या क्रमवारीत भारताचे ११८७ गुण होते.

या क्रमवारीत बेल्जियम पहिल्या स्थानावर आहे. तर, फ्रान्स आणि ब्राझील अनुक्रमे दुसर्‍या आणि तिसर्‍या स्थानावर आहेत. इंग्लंड चौथ्या आणि पोर्तुगाल पाचव्या क्रमांकावर पोहोचण्यात यशस्वी झाला आहे.

नोव्हेंबर २०१९ ते जुलै २०२०पर्यंत भारतीय संघाचे स्थान १०८वे होते. यंदाच्या ऑगस्टमध्ये फिफाची क्रमवारी जाहीर झाली नव्हती. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मस्कतमध्ये ओमान विरुद्ध भारताने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तेथे भारताला ०-१ असा पराभव पत्करावा लागला.

भारताला आता पुढील वर्षी ३१ मार्चला ताजिकिस्तानविरूद्ध मैत्रीपूर्ण सामना खेळायचा आहे. मात्र, हा सामना कोठे खेळला जाईल, तरी अद्याप याबाबत निर्णय झालेला नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.