ETV Bharat / sports

माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे निधन

author img

By

Published : Jul 13, 2021, 11:52 AM IST

Updated : Jul 13, 2021, 5:09 PM IST

भारतीय क्रिकेट संघातील मधल्या फळीतील फलंदाज यशपाल शर्मा यांचे मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 66 वर्षांचे होते.

यशपाल शर्मा
यशपाल शर्मा

मुंबई - भारतीय क्रिकेट संघातील मधल्या फळीतील फलंदाज यशपाल शर्मा यांचे मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 66 वर्षांचे होते.

शर्मा हे 1983 च्या भारतीय क्रिकेटच्या वर्ल्डकप संघातील सदस्य होते. त्यांनी 37 एकदिवसीय आणि 42 कसोटी सामन्यात देशाचे प्रतिनिधीत्व केले आहे. ते 1979 ते 83 या कालावधीत मधल्या फळीतील एक महत्वाचे क्रिकेटपटू होते. त्यांनी काही वर्षे निवड समितीचे सदस्य म्हणूनही काम पाहिले. 2008 मध्ये पुन्हा त्यांना निवड समितीवर नियुक्ती करण्यात आली होती.

शर्मा यांची कारकीर्द

भारताकडून यशपाल शर्मा यांनी ३७ कसोटी सामन्यांमध्ये १६०६ धावा केल्या आहेत. यात १४० धावा ही त्यांची सर्वोत्तम खेळी होती. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यांनी ४२ सामन्यात २८.४८च्या सरासरीने ८८३ धावा केल्या.

1983च्या वर्ल्डकपचे नायक

१९८३च्या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या विजयासह सुरुवात केली. शर्मा यांनी यात महत्त्वाची भूमिका बजावली. जेव्हा ते क्रीजवर आले तेव्हा संघाची धावसंख्या ३ बाद ७६ अशी होती, त्यानंतर भारताने ५ बाद १४१ अशी मजल मारली. शर्मा यांनी १२० चेंडूंत ८९ धावांची खेळी खेळली. ऑस्ट्रेलिया विरुद्ध आक्रमक ४० धावा असोत किंवा कठीण परिस्थितीत इंग्लंडविरुद्ध ६१ धावांची खेळी, शर्मा यांनी भारताला नेहमीच तारले. शर्मा यांनी या स्पर्धेत ३४.२८च्या सरासरीने २४० धावा केल्या.

हेही वाचा - UEFA EURO 2020 : पेनल्टी शूटआऊटमध्ये इंग्लंडला नमवत इटली विजयी!

Last Updated :Jul 13, 2021, 5:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.