ETV Bharat / sports

Tokyo Paralympics मधील भारतीय खेळाडूंसाठी विराट कोहलीचा खास संदेश

author img

By

Published : Aug 24, 2021, 4:59 PM IST

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने भारतीय अॅथलिटना टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये चांगल्या कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या. याआधी सचिन तेंडुलकरने पॅराअॅथलिटना रियल हिरो असल्याचे म्हटलं होतं.

Tokyo Paralympics: Virat Kohli sends best wishes to Indian contingent
Tokyo Paralympics मधील भारतीय खेळाडूंसाठी विराट कोहलीचा खास संदेश

मुंबई - टोकियो पॅराऑलिम्पिकला आजपासून सुरूवात होणार आहे. टोकियोत आज या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा रंगणार आहे. भारताचे 54 खेळाडू या पॅराऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहेत. या दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने भारतीय अॅथलिटना चांगल्या कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या. याआधी सचिन तेंडुलकरने पॅराअॅथलिटना रियल हिरो असल्याचे म्हटलं होतं. तसेच त्यांनी संपूर्ण देशांने खेळाडूंना पाठिंबा द्यावा, अशी विनंती देखील केली होती.

विराट कोहलीने सोमवारी ट्विट करून म्हटलं की, "टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये भाग घेणाऱ्या भारतीय अॅथलिट आणि संघातील सर्व सदस्यांना माझ्याकडून शुभेच्छा आणि त्यांना माझा पाठिंबा आहे. मी तुमच्यातील प्रत्येकांसाठी चीयर करेन आणि मला विश्वास आहे की तुम्ही या स्पर्धेत देशाचे नाव उज्वल कराल."

  • Sending my best wishes and support to the 🇮🇳 contingent at the Tokyo Paralympics. I am cheering for each one of you and I am sure you will make us proud. #TeamIndia #Praise4Para #Tokyo2020

    — Virat Kohli (@imVkohli) August 23, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

विराट कोहलीच्या आधी भारतीय संघाचा माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर याने देखील भारतीय अॅथलिटना शुभेच्छा दिल्या आहेत. यात त्याने पॅराअॅथलिटना सपोर्ट करण्याचे आवाहन देखील केलं आहे.

सचिन तेंडुलकर म्हणाला की, "टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये भाग घेणाऱ्या 54 खेळाडूंना सर्व भारतीयांनी पाठिंबा द्यावा, अशी मी विनंती करतो. माझ्या मते, हे खेळाडू आमच्यासाठी खरे रियर हिरो आहेत."

हेही वाचा - क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी केलं शैली सिंहच्या कामगिरीचे कौतुक

हेही वाचा - Exclusive: अफगाणिस्तानवर तालिबानची सत्ता असूनही क्रिकेटचा विकास सुरू राहिल, अशी आशा करतो - लाचंद राजपूत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.