ETV Bharat / sports

IND VS ENG : भारतीय संघात अजूनही दोष आहेत - नासिर हुसेन

author img

By

Published : Aug 23, 2021, 7:42 PM IST

Updated : Aug 23, 2021, 8:02 PM IST

भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा पराभव झाला. या विजयानंतर भारतीय संघाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. दुसरीकडे इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन याने अजूनही भारतीय संघात दोष असल्याचे म्हटलं आहे.

There are still vulnerabilities in this India side: Nasser Hussain
IND VS ENG : भारतीय संघात अजूनही दोष आहेत - नासिर हुसेन

लंडन - भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. लॉर्डस् मैदानात झालेला उभय संघातील सामना भारताने सांघिक खेळाच्या जोरावर 151 धावांनी जिंकला. विशेष म्हणजे या सामन्यात यजमान इंग्लंड संघाचे पारडे जड होते. पण दुसऱ्या डावात मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह या जोडीने चिवट खेळ केला आणि परिणामी इंग्लंडचा पराभव झाला. या विजयानंतर भारतीय संघाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. दुसरीकडे इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन याने अजूनही भारतीय संघात दोष असल्याचे म्हटलं आहे.

नासिर हुसेनने डेली मेलसाठी कॉलम लिहलं आहे. यात तो म्हणतो, भारतीय संघात अजूनही दोष आहे. इंग्लंडला हेडिंग्लेमध्ये ही बाब लक्षात ठेवली पाहिजे. इंग्लंडच्या संघात जोफ्रा ऑर्चर, बेन स्टोक्स, ख्रिस वोक्स आणि स्टुअर्ट ब्राँड असते तर इंग्लंडचा संघ या मालिकेत सहज विजयी झाला असता. पण त्यांच्याशिवाय देखील राहिलेल्या तीन सामन्यात इंग्लंड जिंकू शकतो.

53 वर्षीय हुसेन म्हणाला, जर तो रुट आणि प्रशिक्षक सिल्वरवूडच्या जागेवर असता तर त्याने हेडिंग्ले कसोटीत अनकॅप्ड वेगवान गोलंदाज साकिब महमूदला निवडलं असतं.

जर मी जो रुट किंवा ख्रिस सिल्वरवूड असतो तर मी सर्वात मजबूत गोलंदाज असलेला संघ निवडला असता. यात मी महमूदला खेळवले असते. क्रेग ओवरटन आठव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. महमूद विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्याच्याकडे अतिरिक्त वेग आहे. याशिवाय त्यांचा चेंडू रिव्हर्स स्विंग होते. त्याचा डेब्यू करायला हवे, असे देखील नासिर हुसेन याने म्हटलं आहे.

इंग्लंडचा कर्णधार जो रुटने विराट कोहलीपासून सतर्क राहिले पाहिजे. इंग्लंडचा संघ अशा नेतृत्वाविरुद्ध खेळत आहे, जो ही मालिका जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावतो. ही मालिका इंग्लंडसाठी खूप कठीण राहणार आहे, असे देखील हुसेन म्हणाला. दरम्यान उभय संघातील तिसऱ्या कसोटी सामन्याला बुधवारपासून सुरूवात होणार आहे.


हेही वाचा - विराट कोहलीच्या बॅटमधून शतक येणार, प्रशिक्षकाचा विश्वास

हेही वाचा - टी-20 विश्वकरंडक अजून सुरूही झालं नाही, पण डॅरेन सॅमीचा मोठा दावा

Last Updated :Aug 23, 2021, 8:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.