भारतीय खेळाडू 2021-22 मध्ये राहणार व्यस्त, 'हे' संघ करणार भारताचा दौरा

author img

By

Published : Sep 20, 2021, 6:21 PM IST

team-india-international-home-season-announced-new-zealand-west-indies-sri-lanka-south-africa-tour-to-india-between-november-2021-june-2022
भारतीय खेळाडू 2021-22 मध्ये राहणार व्यस्त, 'हे' संघ करणार भारताचा दौरा ()

बीसीसीआयने भारतीय संघाचे नोव्हेंबर 2021 ते जून 2022 चे मायदेशातील मालिकांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यात न्यूझीलंड, वेस्ट इंडीज, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौरा करणार आहे. भारतीय संघ या काळात टी-20, एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळणार आहे.

मुंबई - आयपीएल 2021 आणि टी-20 विश्वकरंडक स्पर्धेनंतर भारतीय संघ मायदेशात मालिका खेळणार आहे. बीसीसीआयने नोव्हेंबर 2021 ते जून 2022 चे मायदेशातील मालिकाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यात न्यूझीलंड, वेस्ट इंडीज, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौरा करणार आहे. उभय संघात टी-20, एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे.

न्यूझीलंडचा भारत दौरा (नोव्हेंबर-डिसेंबर 2021)

भारताच्या मायदेशातील मालिकेची सुरूवात न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेने होईल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन टी-20 आणि दोन कसोटी सामन्याची मालिका होणार आहे. किवी टीम 17, 19, 21 नोव्हेंबरला अनुक्रमे जयपूर, रांची आणि कोलकातामध्ये टी-20 सामने खेळेल. त्यानंतर 25 नोव्हेंबर आणि 3 डिसेंबर रोजी होणारे दोन कसोटी सामने अनुक्रमे कानपूर आणि मुंबईत खेळवले जातील.

वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेचा भारत दौरा (फेब्रुवारी ते मार्च)

न्यूझीलंडनंतर वेस्ट इंडिजचा संघ पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात भारत दौऱ्यावर येईल. या दौऱ्यामध्ये उभय संघात 3 टी-20 आणि 3 एकदिवसीय सामन्याची मालिका खेळवली जाणार आहे. वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्याची सुरूवात 6 फेब्रुवारीला आणि अखेर 20 फेब्रुवारीला होईल. वेस्ट इंडिजनंतर श्रीलंकेचा संघ भारताचा दौरा करेल. या दौऱ्यात श्रीलंकेचा संघ 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. यानंतर उभय संघात बंगळुरू आणि मोहाली येथे दोन कसोटी सामने होतील.

दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा (जून 2022)

श्रीलंकेनंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ जून महिन्यात भारतात दाखल होईल. या दौऱ्यात उभय संघात 5 टी-20 सामन्याची मालिका होणार आहे. या दौऱ्यातील पहिल्या टी-20 सामन्याला 9 जूनला तर अखेरचा टी-20 सामना 19 जूनला होणार आहे. भारतीय खेळाडू आयपीएल 2021 ते जून 2022 पर्यंत व्यस्त राहणार आहेत. अशात एक बायोबबलमधून दुसऱ्या बायोबबलमध्ये प्रवेश करणे त्याच्यासाठी आव्हानात्मक ठरेल.

हेही वाचा - KKR vs RCB : आरसीबी आणि केकेआर यांच्यात आज होणार सामना

हेही वाचा - MI Vs CSK : मुंबई इंडियन्सविरुद्धच्या दमदार खेळीबद्दल काय म्हणाला ऋतुराज गायकवाड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.