ETV Bharat / sports

Suryakumar Hugs Hardik Pandya : भारताच्या विजयानंतर मैदानावरच भावूक झाला सूर्या! पांड्याला मिठी मारून आनंद केला व्यक्त

author img

By

Published : Jan 30, 2023, 9:29 AM IST

भारतीय संघाच्या न्यूझीलंडविरुद्धच्या विजयानंतर सूर्यकुमार यादव मैदानावरच भावूक झाला. विजयानंतर त्याने कर्णधार हार्दिक पांड्याला मिठी मारली. मिठी मारतानाचा त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे.

Suryakumar Hugs Hardik Pandya
सूर्यकुमार यादव हार्दिक पांड्याला मिठी

नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताला अवघ्या 100 धावाचं लक्ष्य असतानाही सामना अखेरच्या षटकापर्यंत गेला. ज्यात भारताने एक चेंडू आणि 6 विकेट्स राखून विजय मिळवला. सूर्यकुमार यादवला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. या सामन्यातील विजयानंतर सूर्यकुमार यादव भावूक झाला. सूर्याने संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याला मैदानावरच मिठी मारली. बीसीसीआयने आपल्या ट्विटरवर हॅंडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. सूर्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सूर्यकुमार यादवची महत्त्वपूर्ण खेळी : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताला अवघ्या 100 धावाचं लक्ष्य असतानाही अखेरच्या षटकापर्यंत सामना गेला. ज्यात भारताने एक चेंडू आणि 6 विकेट्स राखून विजय मिळवला. गोलंदाजीत सर्वच गोलंदाजांनी कमाल कामगिरी केल्यावर फलंदाजीत सूर्यकुमार यादवने अखेपर्यंत टिकून राहून नाबाद 26 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. कॅप्टन हार्दिकनं नाबाद 15 धावांची साथ त्याला दिली. या विजयासह भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. सूर्यकुमार यादवने सामनावीराचा किताब पटकावला.

भारताचा संघर्ष : भारताला विजयासाठी मिळालेले १०० धावांचे आव्हान हे मोठे नव्हते. भारताला शुभमन गिलच्या रुपात पहिला धक्का बसला. चौथ्या षटकात गिलला ब्रेसवेलने माघारी धाडले. त्याला केवळी सात धावा करता आल्या. त्यानंतर इशान किशन आणि राहुल त्रिपाठी ही जोडी मैदानात आली. आक्रमक फटकेबाजी करणारा इशान किशन यावेळी संथपणे खेळत होता आणि याचाच फटका त्याला बसला. इशानने ३२ चेंडूंचा सामना करत १९ धावा केल्या. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील शेवटचा आणि तिसरा T20 सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. हा सामना बुधवार 1 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

भारतात प्रथमच षटकारांशिवाय टी-20 सामना : कालच्या सामन्यानंतर आता लखनौच्या खेळपट्टीबाबत तज्ज्ञांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. ही खेळपट्टी टी-२० सामन्यासाठी योग्य नव्हती, असे क्रिकेटर गौतम गंभीरचे मत आहे. भारतीय भूमीवर टी20 सामन्यात एकही षटकार लगावला न गेल्याची ही पहिलीच वेळ आहे. टी-20 इंटरनॅशनलचा विचार केला तर या आधी तीन वेळा टी-20 सामने षटकारांशिवाय खेळले गेले आहेत.

हेही वाचा : IND Vs NZ : न्यूझीलंडच्या सामन्यात टीम इंडियाच्या नावे हा नकोसा रेकॉर्ड...गौतम गंभीरने कुणावर फोडले खापर?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.