ETV Bharat / sports

सुनील गावसकर पोहोचले 'सचीन' रेल्वे स्थानकावर! फोटो व्हायरल; जाणून घ्या कुठे आहे हे स्टेशन

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 28, 2023, 7:41 PM IST

Sachin railway station
Sachin railway station

Sachin Railway Station : दिग्गज सलामीवीर सुनील गावसकर यांनी इंस्टाग्रामवर गुजरातमधील एका रेल्वे स्टेशनचा फोटो शेअर केलाय. फोटोमध्ये गावसकर यांनी रेल्वे स्थानकाकडे बोट दाखवत काहीतरी म्हटलं आहे. वाचा पूर्ण बातमी.

नवी दिल्ली Sachin Railway Station : 'लिटिल मास्टर' सुनील गावसकर सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. नुकताच त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला. हा फोटो एका रेल्वे स्थानकाचा आहे. हे स्टेशन गुजरातमधील सुरतजवळ अहमदाबाद-जयपूर-दिल्ली मार्गावर आहे. या स्टेशनची खास बात म्हणजे, याचं नाव 'सचीन' (SACHIN) असं आहे. आता तुम्ही विचार करत असाल की, हे नाव दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या नावावरून ठेवण्यात आलं असेल, मात्र प्रत्यक्षात तसं नाही.

सुनील गावसकर यांची पोस्ट : पोस्ट करताना गावसकर यांनी लिहिलं की, "गेल्या शतकातील लोकांनी सुरतजवळील एका स्थानकाला सर्वकालीन महान क्रीडापटूंपैकी एक, माझा आवडता क्रिकेटर आणि माझ्या आवडत्या माणसाचा नाव दिलं. त्यांची दूरदृष्टी किती आश्चर्यकारक होती!" त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. मात्र तसं हे नाव सचिनच्या नावावरुन देण्यात आलं नाही. तर या स्टेशनच्या जवळ सचिन नावाची औद्योगिक वसाहत आहे. त्यावरुन हे नाव देण्यात आलं आहे. मात्र गावसकर यांच्या या पोस्टवर क्रिकेट चाहते आपापल्या पद्धतीनं प्रतिक्रिया देत आहेत.

गावसकर यांना सचिन आदर्श मानतो : सचिन तेंडुलकर नेहमीच सुनील गावसकर यांना आपला आदर्श मानत आला आहे. सचिननं एका पोस्टमध्ये म्हटलं होतं की, "माझ्या तरुणपणी सुनील गावसकर यांच्या रुपात एक आदर्श खेळाडू होता. मी त्यांच्यासारखं बनण्याचा प्रयत्न करायचो. ते अजूनही माझे हिरो आहेत". येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, सुनील गावसकर हे भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्तम सलामीवीर फलंदाजांपैकी एक होते.

सुनील गावसकर यांची कारकीर्द : सुनील गावसकर यांनी सर्वप्रथम कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा गाठला. गावसकर यांनी १२५ कसोटी सामन्यांच्या २१४ डावांमध्ये १०१२२ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्यांनी सरासरी ५१.१२ एवढी राहिली. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर ३४ शतकं आणि २ द्विशतकं आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये गावसकर यांनी १०२ डावांमध्ये ३५.१४ च्या सरासरीनं ३०९२ धावा केल्या आहेत. १०३ ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या आहे.

हेही वाचा :

  1. Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचं वानखेडेवर अनावरण
  2. सचिनकडून विराटला 'आयकॉनिक नंबर १० जर्सी' भेट, वाचा का आहे खास
  3. Virat Kohli : शतकांच्या विक्रमाची बरोबरी करताच सचिनच्या विराटला अनोख्या शब्दात शुभेच्छा!
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.