ETV Bharat / sports

काहीवेळा आपण वरिष्ठ खेळाडूंवर थोडे कठोर होऊ शकतो; पुजारा, रहाणे यांनी परतफेड केली: सुनील गावस्कर म्हणाले

author img

By

Published : Jan 7, 2022, 7:54 PM IST

माजी दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर ( Former veteran Sunil Gavaskar ) यांनी भारताच्या पराभवावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर त्यांनी भारताचे अनुभवी खेळाडू चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.

Sunil Gavaskar
सुनील गावस्कर

जोहान्सबर्ग: चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara ) आणि अजिंक्य रहाणे यांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास त्यांनी सार्थ करुन दाखवला आहे. तरूण प्रतिभांना आकर्षित करणं सोपं आहे, पण संघाने त्यांच्या वरिष्ठ खेळाडूंवर जो विश्वास दाखवला आहे, तो विश्वास खेळाडूंना खराब कामगिरीतून बाहेर पडण्यास फायदेशीर ठरला, असे माजी दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर ( Former veteran Sunil Gavaskar ) म्हणाले आहेत. खराब प्रदर्शनानंतर, पुजारा आणि रहाणे ( Ajinkya Rahane form ) या जोडीने दुसऱ्या कसोटीतील भारताच्या दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावत चांगली फलंदाजी केली.

गावसकर यांनी एका मीडिया आउटलेटशी बोलताना सांगितले ( Sunil Gavaskar said in a media outlet ) की, "या अनुभवामुळे आणि त्याने यापूर्वी केलेल्या कामगिरीमुळे संघाने त्यांना पाठिंबा दिला आहे. संघाला विश्वास होता की, ते चांगली कामगिरी करतील आणि त्यांनी ते करुन दाखवले. कधीकधी आम्ही आमच्या काही वरिष्ठ खेळाडूंबद्दल थोडे कठोर होवू शकतो. कारण आपल्याकडे युवा खेळाडू देखील आहेत. त्यामुळे आम्हा सर्वांना त्यांचे थोडेसे एक्सपोजर पाहायचे आहे. पण जोपर्यंत हे वरिष्ठ खेळाडू चांगले खेळत आहेत आणि वाईट रीतीने आउट होत नाहीत. तोपर्यंत आपण त्यांच्यावर विश्वास दाखवायला हवा.”

भारताला नियमित कर्णधार विराट कोहलीच्या ( Captain Virat Kohli ) व्यतिरिक्त उतरावे लागले होते, जो पाठीच्या खालच्या दुखण्यामुळे नाणेफेकीच्या काही मिनिटांपूर्वी कसोटीतून बाहेर पडला होता. भारतीय संघ दुसऱ्या कसोटी सामन्यात आपला नियमित करणार विराट कोहली शिवाय मैदानावर उतरला होतो. कारण विराट कोहलीने पाठीच्या दुखापतीमुळे सामना सुरु होण्या अगोदर काही मिनिटे शिल्लक असताना सामन्यातून ( Virat Kohli was ruled out due to a back injury ) माघार घेतली. परंतु आश्चर्यकारक म्हणजे विराट कोहली न खेळलेला कसोटी सामना भारताने हरण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यांनी सिडनीमध्ये एकदाच ड्रॉ केले होते . अन्यथा नेहमीच संघाने विजय मिळवला आहे. रहाणे आणि पुजाराच्या खेळीनंतरही, भारत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना, विशेषतः कर्णधार डीन एल्गरला रोखण्यात अपयशी ठरला आहे. ज्यामुळे गुरुवारी मालिकेत दक्षिण आफ्रिका संघाने 1-1 अशी बरोबरी साधली.

कर्णधार केएल राहुलच्या फील्ड प्लेसमेंटने गावसकर प्रभावित झाले नाहीत -

त्यांनी भारतीय क्षेत्ररक्षणावर टीका केली. मला वाटले की डीन एल्गरला ( South Africa captain Dean Elgar ) डावाच्या सुरुवातीला सिंगल दिल्याने त्याच्यासाठी फलंदाजी करणे थोडे सोपे होते. एल्गरसाठी दोन खेळाडूंना डिपवर ठेवणे योग्य नव्हते. तो खूप आरामात सिंगल घेत होता. भारतीय क्षेत्ररक्षण तेवढेच वेगवान होऊ शकले असते. परंतु, हा सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला ( match was won by South Africa ). मला वाटत नाही की भारतीयांनी हा सामना गमावला आहे, दक्षिण आफ्रिकेने हा सामना जिंकला आहे,” असे गावस्कर म्हणाले.


हेही वाचा - IND vs SA 2nd Test : दक्षिण आफ्रिकेचा भारतावर शानदार विजय; मालिका 1-1 ने बरोबरीत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.