ETV Bharat / sports

Border Gawaskar Trophy : या 5 खेळाडूंनी केल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा

author img

By

Published : Feb 4, 2023, 5:12 PM IST

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना 9 फेब्रुवारीपासून नागपुरात सुरू होणार आहे. भारतीय संघ नागपुरात पोहोचला असून नेट सराव करत आहे.

Border Gawaskar Trophy
या 5 खेळाडूंनी केल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा

नवी दिल्ली : 16व्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी अंतर्गत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. ट्रॉफी जिंकण्यासाठी भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि कांगारूंचा कर्णधार पॅच कमिन्स कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत 102 कसोटी सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा आहे. ऑस्ट्रेलियाने 43 सामने जिंकले आहेत तर भारताने 30 सामने जिंकले आहेत.

तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर : या दोघांमध्ये 28 सामने अनिर्णित राहिले तर एक सामना बरोबरीत राहिला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताचे 5 खेळाडू (IND vs AUS) यशस्वी झाले आहेत. त्यात सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे. सचिन तेंडुलकरने 39 सामन्यांमध्ये 3630 धावा केल्या आहेत ज्यात 11 शतकांचा समावेश आहे. त्याच्यानंतर व्हीव्हीएस लक्ष्मणने 28 सामन्यात 2434 धावा केल्या आहेत ज्यात 6 शतकांचा समावेश आहे.

कसोटी सामन्यांमध्ये भिंत : भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्या टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला कसोटी सामन्यांमध्ये भिंत म्हटले जाते. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 32 कसोटी सामन्यांमध्ये 2143 धावा केल्या आहेत. चेतेश्वर पुजाराने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 20 सामन्यात 1893 धावा केल्या आहेत. याशिवाय वीरेंद्र सेहवागने भारतासाठी 22 कसोटी सामन्यांमध्ये तीन शतकांसह 1738 धावा केल्या आहेत. सेहवागनेही भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावले आहे.

येथे कसोटी सामने होणार आहेत : पहिली कसोटी - 9 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी, विदर्भ क्रिकेट असोसिएशन. नागपूर दुसरी कसोटी - 17 ते 21 फेब्रुवारी, अरुण जेटली स्टेडियम. दिल्ली तिसरी कसोटी - 1 ते 5 मार्च, हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन. धर्मशाला चौथी कसोटी - 9 ते 13 मार्च, नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद.

दिनेश कार्तिकची बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये एंट्री : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 9 फेब्रुवारीपासून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा पहिला कसोटी सामना खेळवला जाणार आहे. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये हा सामना होणार आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या मालिकेतून भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक सेटवर परतणार आहे. या सामन्यात दिनेश कार्तिक कॉमेंट्री करताना दिसणार आहे. या सामन्यादरम्यान दिनेश कार्तिक इतर समालोचकांसोबत कॉमेंट्री बॉक्सचा भाग असेल. आतापर्यंत याविषयी फक्त चर्चा होत होती, मात्र आता या मालिकेत दिनेश कॉमेंट्री करताना दिसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा : Asian council emergency meet : जय शाह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक; पाकिस्तानकडून हिसकावले जाऊ शकते यजमानपद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.