ETV Bharat / sports

मोठी बातमी ! जडेजाने चेन्नईचे कर्णधारपद सोडले; धोनीकडे पुन्हा संघाचे नेतृत्व

author img

By

Published : Apr 30, 2022, 7:51 PM IST

Updated : Apr 30, 2022, 8:31 PM IST

अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने ( Ravindra Jadeja ) चेनई सुपरकिंग्स संघाचे कर्णधार पद ( Chennai Super Kings ) सोडले आहे. संघाची धुरा पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोनीकडे देण्यात आली ( Chennai Super Kings Captaincy Ms Dhoni ) आहे.

ravindra jadeja ms dhoni
ravindra jadeja ms dhoni

हैदराबाद - अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने ( Ravindra Jadeja ) चेनई सुपर किंग्स संघाचे ( Chennai Super Kings ) कर्णधार पद सोडले आहे. संघाची धुरा पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोनीकडे देण्यात आली आहे. आपल्या खेळावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी कर्णधार पदाचा राजीनामा देत असल्याचे रविंद्र जडेजाने सांगितले ( Chennai Super Kings Captaincy Ms Dhoni ) आहे. याबाबतची माहिती चेन्नई सुपर किंग्जच्या अधिकृत ट्विटरवर देण्यात आली आहे.

चेन्नई सुपर किंग्जने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "जडेजा संघाचे कर्णधार पुन्हा एमएस धोनीकडे सोपवेल. रविंद्र जडेजाने आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करण्यासाठी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. एमएस धोनीला चेन्नईचे नेतृत्व करण्याची विनंती केली. एमएस धोनीने मोठ्या कामगिरीसाठी आणि जडेजाला त्याच्या खेळावर लक्ष केंद्रित करण्यासाठी संघाचे नेतृत्व स्वीकारले आहे."

आयपीएलच्या पंधराव्या हंगामात सुरुवातीलाच धोनीने आपले कर्णधारपद सोडले होते. त्याने रविंद्र जडेजाकडे कर्णधार पदाची धुरा सोपवली होती. मात्र, जडेजाच्या नेतृत्वाखाली संघाला घोडदौड करता नाही. आठ सामन्यांमध्ये फक्त दोन विजय संघाला मिळवता आले आहे. तर, सहा पराभवासह चेन्नईचा संघ गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर आहे.

जडेजाची कामगिरी ढासळली - कर्णधारपदाची धुरा घेतल्यापासून जडेजाला फलंदाजी आणि गोलंदाजीत पाहिजे तशी कामगिरी करता आली नाही. आठ सामन्यात जडेजाने फक्त 112 धावाच केल्या आहेत. तर, गोलंदाजी करताना या हंगामात आतापर्यंत त्याने फक्त पाच विकेट घेतल्या आहेत. म्हणूनच जडेजाने आपल्या ढासळलेल्या खेळावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी कर्णधारपद सोडले आहे. त्यामुळे आता संघाचे कर्णधारपद धोनीकडे असेल.

हेही वाचा - Rohit Sharma Birthday : हिटमॅन रोहितला पत्नीच्या हटके शुभेच्छा; म्हणाली, "आमचा हकुना मटाटा बनण्यासाठी..."

Last Updated :Apr 30, 2022, 8:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.