ETV Bharat / sports

IPL 2022 Updates : कोलकात्यावर रोमांचक विजय मिळवल्यानंतर राशिद खानने दिली मोठी प्रतिक्रिया

author img

By

Published : Apr 24, 2022, 5:48 PM IST

Rashid Khan
Rashid Khan

शनिवारी झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने 8 धावांनी कोलकात्यावर विजय मिळवला. त्यानंतर गुजरात टायटन्सचा उपकर्णधार राशिद खानने ( GT vs KKR ) कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्धच्या सामन्यातील रोमांचक विजयावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग 2022 मध्ये शनिवारी (23 एप्रिल) डबल हेडर सामने खेळले गेले. यामधील पहिला म्हणजे 35 वा सामना कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स ( Kolkata Knight Riders vs Gujarat Titans ) संघात डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात गुजरात टायटन्सने 8 धावांनी कोलकात्यावर विजय मिळवला. त्यानंतर गुजरात टायटन्सचा उपकर्णधार राशिद खानने ( Gujarat Titans Vice-Captain Rashid Khan ) कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्धच्या सामन्यातील रोमांचक विजयावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

तो म्हणाला की, या खेळपट्टीवर खूप चांगली धावसंख्या होती आणि आम्हीही चेंडूने चांगली सुरुवात केली होती. गुजरात टायटन्सचा ( Gujarat Titans ) या मोसमातील हा पाचवा विजय असून गुणतालिकेत ते पहिल्या स्थानावर आहेत. प्रथम खेळताना गुजरातने कर्णधार हार्दिक पंड्याच्या 67 धावांच्या जोरावर 9 बाद 156 धावा केल्या. प्रत्युत्तरात कोलकाताचा संघ आठ विकेट्सवर केवळ 148 धावाच करू शकला.

विकेट्सच्या बाबतीत आमची चांगली धावसंख्या होती - संघाच्या या विजयानंतर राशिद खानने कर्णधार हार्दिक पांड्याच्या ( Captain Hardik Pandya ) फलंदाजीचे कौतुक केले. याशिवाय गोलंदाजांच्या कामगिरीचेही त्यांनी कौतुक केले. राशिद खान म्हणाला, तो एक महान विजय होता. हार्दिकने ज्या प्रकारे टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी केली, मला वाटते की या विकेटवर ही खूप चांगली धावसंख्या होती. बॉलसह आमची सुरुवातही अतिशय अचूक होती. माझ्या मते वेगवान गोलंदाज चांगले सेटअप होते आणि मी शक्य तितकी कडक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला.

आयपीएलमध्ये 100 बळी पूर्ण - या सामन्यात राशिद खाननेही मोठी कामगिरी केली आहे. आयपीएलमध्ये 100 बळी घेणारा ( 100 wickets in IPL ) तो सर्वात जलद विदेशी फिरकी गोलंदाज ठरला आहे. आयपीएलमध्ये सहावा हंगाम खेळणाऱ्या राशिदने व्यंकटेश अय्यरला 100 वा बळी बनवला. लीगमध्ये सर्वात जलद 100 बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत रशीद खान लेगस्पिनर अमित मिश्रा आणि वेगवान गोलंदाज आशिष नेहरासह संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचा - No Ball Controversy : 'नोबॉल' प्रकरण नडले; दिल्ली संघातील 'या' तिघांवर आयपीएलकडून कारवाई

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.