ETV Bharat / sports

IPL 2022 KKR vs LSG : नाणेफेक जिंकून लखनौ संघाचा प्रथम फलंदाजी निर्णय; दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल

author img

By

Published : May 18, 2022, 7:25 PM IST

KKR vs LSG
KKR vs LSG

आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 66 वा सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात खेळला जाणार आहे. हा सामना कोलकाता आणि लखनौ संघासाठी महत्वाचा आहे. हा सामना डॉ. डी. व्हाय. पाटील स्टेडियमवर साडेसातला खेळला जाणार आहे. तत्पुर्वी नाणेफेक पार पडली आहे आणि लखनौ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या हंगामातील 66 वा सामना बुधवारी डॉ. डी.व्हाय. पाटील स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स ( Kolkata Knight Riders vs Lucknow Super Giants ) संघात संध्याकाळी साडेसातला सुरु होणार आहे. या दोन संघातील हा दुसरा सामना आहे. पहिल्या सामन्यात कोलकाता संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याचबरोबर आजचा सामना दोन्ही संघाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. दोन्ही संघाचे कर्णधार श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांच्यात नाणेफेक पार पडली. लखनौ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय ( Lucknow Super Giants opt to bat ) घेतला आहे.

आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघानी आपापल्या संघात एक बदल केला आहे. कोलकाता संघाने दुखापतीमुळे बाहेर पडलेल्या अजिंक्य रहाणेच्या जागी अभिजीत तोमरला पदार्पणाची संधी दिली आहे. तसेच लखनौ संघाने देखील आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला आहे. मनन व्होरा आज संघात संधी देण्यात आली आहे.

लखनौ सुपरजायंट्स संघाने ( Lucknow Super Giants Team ) आतापर्यंत 13 सामने खेळले असून त्यापैकी 8 सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच पाच सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे, त्यामुळे या संघाचे 16 गुण असून संघ गुणतालिकेत तिसरऱ्या स्थानी आहे. त्याचबरोबर कोलकाता संघाने ( Kolkata Knight Riders ) देखील 13 पैकी 6 सामन्यात 12 गुण प्राप्त केले आहेत. त्यामुळे हा संघ सहाव्या स्थानी आहे.

कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): व्यंकटेश अय्यर, अभिजीत तोमर, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, सॅम बिलिंग्स (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, उमेश यादव, टीम साऊदी आणि वरुण चक्रवर्ती.

लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), केएल राहुल (कर्णधार), एविन लुईस, दीपक हुडा, मनन वोहरा, मार्कस स्टॉइनिस, जेसन होल्डर, कृष्णप्पा गौथम, मोहसीन खान, आवेश खान आणि रवी बिश्नोई.

हेही वाचा - Katie Martin Announces Retirement: केटी मार्टिनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा


ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.