ETV Bharat / sports

Blind cricket world cup : पाकिस्तानच्या 'या' 34 खेळाडूला मिळाला व्हिसा, भारतात होणाऱ्या विश्वचषकात 'हे' संघ होणार सहभागी

author img

By

Published : Dec 7, 2022, 11:01 AM IST

पाकिस्तानच्या 34 खेळाडू आणि अधिकाऱ्यांना ब्लाईंड T20 विश्वचषकासाठी व्हिसा मिळाला (The Union Home Ministry has approved visas for 34 Pakistani players and officials) आहे. पाकिस्तान संघाच्या मान्यतेनंतर आता या 12 दिवसांच्या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, नेपाळ आणि दक्षिण आफ्रिका असे सात संघ सहभागी होणार आहेत. फरिदाबाद, दिल्ली, मुंबई, इंदूर आणि बंगळुरू येथे सामने खेळवले जातील. (Blind cricket world cup)

Blind cricket world cup
अंध क्रिकेट विश्वचषक

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या 34 खेळाडू आणि अधिकाऱ्यांच्या व्हिसाला केंद्रीय गृहमंत्रालयाने मंजुरी दिली आहे (The Union Home Ministry has approved visas for 34 Pakistani players and officials). आता पाकिस्तानी ब्लाईंड क्रिकेट संघाचा भारतात सुरू असलेल्या ब्लाईंड T20 विश्वचषक स्पर्धेत खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गृह मंत्रालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर, परराष्ट्र मंत्रालय पाकिस्तानी खेळाडू आणि अधिकाऱ्यांना व्हिसा जारी करेल जेणेकरून ते 5 ते 17 डिसेंबर दरम्यान भारतात होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. (Blind cricket world cup)

व्हिसा देण्यास मान्यता दिली : मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, गृह मंत्रालयाने ब्लाईंड विश्वचषक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानच्या 34 खेळाडू आणि अधिकाऱ्यांना व्हिसा देण्यास मान्यता दिली आहे. यापूर्वी, पाकिस्तान ब्लाइंड क्रिकेट कौन्सिल (Pakistan Blind Cricket Council) ने मंगळवारी एक निवेदन जारी करून संघाला भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून परवानगी मिळाली नसल्याचा दावा केला होता.

गंभीर परिणाम जागतिक ब्लाईंड क्रिकेटला भोगावे लागतील : पीबीसीसी (PBCC) ने एका निवेदनात म्हटले आहे की, या दुर्दैवी घटनेमुळे पाकिस्तानचा ब्लाईंड क्रिकेट संघ विश्वचषक खेळू शकणार नाही. या भेदभावपूर्ण कारवाईचे गंभीर परिणाम जागतिक ब्लाईंड क्रिकेटला भोगावे लागतील. भविष्यात भारताला आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे यजमानपद मिळू नये यासाठी आम्ही जागतिक ब्लाईंड क्रिकेटकडे भारतावर कठोर कारवाई करण्याची मागणी करणार आहोत.

सात संघ सहभागी होणार : गेल्या टी-20 विश्वचषकात पाकिस्तान दुसऱ्या स्थानावर होता. क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडिया (CABI) ने पुष्टी केली की, पाकिस्तान स्पर्धेत सहभागी होऊ शकला नाही आणि स्पर्धेचे वेळापत्रक पुन्हा जारी केले जाईल. पाकिस्तान संघाच्या मान्यतेनंतर आता या 12 दिवसांच्या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, नेपाळ आणि दक्षिण आफ्रिका असे सात संघ सहभागी होणार (Seven teams will participate) आहेत. फरिदाबाद, दिल्ली, मुंबई, इंदूर आणि बंगळुरू येथे सामने खेळवले जातील.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.