ETV Bharat / sports

IPL 2022 Updates : आयपीएलच्या पहिल्या सामन्यात 'या' कारणामुळे मोईन अली खेळण्याची शक्यता कमी

author img

By

Published : Mar 23, 2022, 3:17 PM IST

IPL
IPL

चेन्नई सुपर किंग्जला आयपीएल 2022 च्या पहिल्या सामन्यात अष्टपैलू खेळाडू मोईन अली शिवाय उतरावे लागू शकते (Moin doubtful play IPL first match). नुकत्याच आलेल्या एका अहवालात ही बाब समोर आली आहे.

मुंबई: जगातील सर्वात मोठी टी-20 लीग आयपीएल 2022 स्पर्धेची सुरुवात होण्यासाठी फक्त तीन दिवसाचा अवधी शिल्लक राहिला आहे. आयपीएलच्या पंधराव्या हंगामाचा पहिला सामन चेन्नई सुपर किग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स ( CSK v KKR ) संघात होणार आहे. या सामन्यात सीएसकेला अष्टपैलू खेळाडू मोईन अली ( All-rounder Moin Ali ) शिवाय उतरावे लागू शकतो. याचे मागचे कारण म्हणजे इंग्लंच्या या खेळाडूला टी-20 सामन्यासाठी अजून भारतीय व्हिसा मिळालेला नाही.

आयपीएल 2022 चा पहिला सामना शनिवारी वानखेडे स्टेडियमवर चार वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ज ( Chennai Super Kings ) आणि गेल्या वर्षीचा उपविजेता कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders ) यांच्यात होणार आहे. एका वृत्तानुसार, मोईन अलीला कोलकाता विरुद्धचा सामन्यात खेळण्यासाठी बुधवारपर्यंत मुंबईत हजर रहावे लागेल. जे सध्या कठीण वाटत आहे.

अहवालात म्हटले आहे की, 'आयपीएलच्या बायो बबलमध्ये प्रवेश करण्यासाठी मोईनला तीन दिवस क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्जच्या व्यवस्थापनाने ( Chennai Super Kings Management ) स्विकार केला आहे की, पहिल्या सामन्यात त्याची खेळण्याची शक्यता खूपच कमी आहे.' या अहवालात असेही म्हटले आहे की, जर मोईन वेळेवर पोहोचला नाही तर न्यूझीलंडचा फलंदाज डेव्हन कॉनवेला आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. मोईनने गेल्या वर्षी आयपीएलमध्ये चेन्नईकडून 15 सामन्यांमध्ये 357 धावा करताना सहा विकेट घेतल्या होत्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.