Kane Williamson Covid Positive : दुसऱ्या कसोटीच्या पूर्वसंध्येला केन विल्यमसनला कोरोनाची लागण

author img

By

Published : Jun 10, 2022, 3:01 PM IST

Kane Williamson

कर्णधार केन विल्यमसनची ( Captain Kane Williamson ) गुरुवारी सौम्य लक्षणांनंतर रॅपिड अँटीजेन चाचणी (आरएटी) झाली आणि आता तो पाच दिवस आयसोलेशनमध्ये राहणार आहे. संघातील उर्वरित सदस्यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे.

नॉटिंगहॅम: न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनची कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह ( Kane Williamson Covid-19 Positive ) आली असून, शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीला तो मुकणार आहे.

  • NEWS | Captain Kane Williamson will miss the 2nd Test against England on Friday, after testing positive for Covid-19 the night before the match. #ENGvNZhttps://t.co/XI3ccpfRnU

    — BLACKCAPS (@BLACKCAPS) June 9, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

विल्यमसनच्या अनुपस्थितीत टॉम लॅथम संघाचे नेतृत्व करेल ( Tom Latham will lead the team ). विल्यमसनची गुरुवारी सौम्य लक्षणांनंतर रॅपिड अँटीजेन चाचणी (आरएटी) झाली आणि आता तो पाच दिवस आयसोलेशनमध्ये राहणार आहे. संघातील उर्वरित सदस्यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे.

न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टेड ( New Zealand coach Gary Stead )यांनी पुष्टी केली की, विल्यमसनच्या जागी हॅमिश रदरफोर्ड संघात सामील होईल. स्टेड म्हणाले, एवढ्या महत्त्वाच्या सामन्याच्या पूर्वसंध्येला केनला बाहेर जाण्यास भाग पडले, हे निराशाजनक आहे. हमिश याआधी कसोटी संघासोबत होता आणि सध्या व्हिटॅलिटी टी-20 ब्लास्टमध्ये लीसेस्टरशायर फॉक्सकडून खेळत आहे.

हेही वाचा - IND vs SA 1st T20 : दक्षिण आफ्रिकेकडून भारताचा 7 विकेट्सने पराभव; इशान किशनची अर्धशतकी खेळी व्यर्थ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.